महापुरुषांच्या विचारांचा अंगिकार करत राज्याची सर्वागिण प्रगती - आ. राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर Live
0

राहाता येथे आमदार राधाकृष्ण ‌विखे पाटील व शिर्डी येथे  उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण

संगमनेर Live (शिर्डी) | छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचार व मूल्यांचा अंगिकार करत महाराष्ट्र राज्यांने ६२‌ वर्षात विविध क्षेत्रात सर्वांगीण प्रगती केली आहे. अशा शब्दांत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे शुभेच्छा दिल्या. 

राहाता तहसील येथील मुख्य प्रशासकीय भवन येथील महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापनदिनाचा ध्वजारोहण सोहळा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते १ मे २०२२ रोजी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,‌ तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, राहता नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नायब तहसीलदार सुधाकर ओहोळ, तालुका आरोग्यधिकारी संजय घोलप, उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, मंडळ अधिकारी अनिल मांढरे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव सदाफळ तसेच तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

आ. विखे पाटील म्हणाले, राज्याची भूमी क्रांतिकारकारांची आहे. संत वारकऱ्यांची विचार परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. येथील परिसर निसर्ग संपदेने नटलेला आहे. त्यात अहमदनगर जिल्हा हा सहकार पंढरी म्हणून ओळखला जातो. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठराव मेहता यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. नेवासा येथे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अशा समृद्ध वारसा लाभलेला अहमदनगर जिल्हा आहे.

राज्याच्या प्रगतीत सर्व सामाजिक घटकांचे योगदान - उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे.

राज्याच्या प्रगतीत सर्व सामाजिक घटकांचे योगदान असून राज्य प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. असे मत शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे ‌यांनी आज येथे व्यक्त केलें.

श्री. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल प्रांगणात सकाळी ७.१० वाजता शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शुभेच्छा देतांना गोविंद शिंदे बोलत होते. यावेळी‌ शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, प्रभारी नायब तहसीलदार शुक्लेश्वर इजगे, अव्वल कारकून भाऊसाहेब शेळके, मंडलाधिकारी अनिल गुगळे, लघुलेखक यशवंत कुसळकर, महसूल सहायक सुर्यकांत खोजे, तलाठी भाऊपाटील जाधव व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.

तत्पूर्वी, शिर्डी नगरपरिषद प्रांगणातील ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना राज्य वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !