◻ आ. राधाकृष्ण विखे पाटिल यांच्याकडून उमेदवाराचा संत्कार
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेची सेवा सहकारी संस्था म्हणून लौकिक असलेल्या उंबरी बाळापूर सेवा सहकारी संस्थेवर माजीमंत्री व भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील व जनसेवा मंडळाचे मार्गदर्शक रामभाऊ भुसाळ याच्या जनसेवा मंडळाने निर्विवाद वर्चस्व राखत १३ जागा बिनविरोध करत सत्ता राखली आहे.
नुकतीच सेवा सोसायटीच्या १३ जागासाठी २०२२-२७ साठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ५४ जणानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ४ मे रोजी माघारीच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे केवळ १३ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.
यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून बापूसाहेब शंकरराव भुसाळ, पांडुरंग धोडींबा भुसाळ, सुरेश धोडींबा बाम्हणे, नितीन भागवत उंबरकर, ताराचंद दशरथ भुसाळ, नामदेव महादु भुसाळ, अशोक श्रीरंग निर्मळ, बाळकृष्ण बाबुराव भुसाळ हे उमेदवार बिनविरोध झाले.
इतर मागास प्रवर्गातून सुखदेव प्रभाकर डोखे, महिला प्रवर्गातून मंदाबाई मारुती सारबंदे, मंगल आबाजी उंबरकर, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून शिवाजी दारकू शिखरे व भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागास प्रवर्गातून सुभाष गेणू जुंधारे असे १३ उमेदवार या निवडणूक प्रक्रीयेत बिनविरोध झाल्याने जनसेवा मंडळाने एकहाती बाजी मारली आहे.
दरम्यान सर्व बिनविरोध झालेल्या विजयी उमेदवाराचे माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, जनसेवा मंडळाचे मार्गदर्शक रामभाऊ भुसाळ आदिंसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.