◻ तिरंगी लढतीत आ. विखे पाटील यांच्या दोन गटाची सरशी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा दाढ खुर्द सेवा सहकारी सोसायटीवर भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री विखे पाटील कारखाण्याचे संचालक हभंप शांताराम जोरी यांच्या नेतृत्वाखालील गटाने ८ तर दुसऱ्या गटाने ५ जागा जिकूंन एकहाती सत्ता राखली आहे.
दाढ खुर्द सेवा सोसायटीची नुकतीचं २०२२-२७ साठी पंचवार्षिक निवडूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून मनोहर जानकू जोशी (२०३), भाऊसाहेब रंभाजी जोशी (२००), बापु भिका जोशी (१८०), साहेबराव गणपत भांड (१७९), रामलाल कोंडाजी कहार (१७४), अशोक भागवत जोशी (१९३), रावसाहेब गेणू जोशी (१९२) व भारत नारायण पर्वत (१७४) हे विजयी झाले आहेत.
महिला राखीव प्रवर्गातून शोभा नामदेव वाडगे (२०४) व पारुबाई तुकाराम जोरी या महिला विजयी झाल्या. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून सिताराम तुकाराम साळवे, इतर मागास प्रवर्गातून अनिल मारुती पर्वत व भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्गातून संजय रघुनाथ जोशी हे उमेदवार विजयी झाले आहे.
यावेळी झालेल्या निवडणूकीत सेवा सोसायटीत सत्ता स्थापनेसाठी आ. विखे पाटील याना मानणारे दोन गट व ना. बाळासाहेब थोरात याना मानणारा गट याच्यात थेट तिरंगी लढत झाली. निवडणूक निकालानतंर कारखाण्याचे संचालक हभंप शांताराम जोरी, नारायण कहार, आण्णा गेणू जोशी, सरपंच सतिश जोशी, बाबासाहेब वाडगे याच्या मार्गदर्शनाखाली ८ तर अशोक भागवत जोशी, रावसाहेब गेणू जोशी व संजय रघुनाथ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जागा निवडून आल्या. त्यामुळे १३ - ० असे निर्विवाद वर्चस्व आ. विखे पाटील याच्यां दोन्ही गटाने राखल्याचे स्पष्ट झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एस. शेख यानी काम पाहिले.
दरम्यान या सर्व विजयी उमेदवाराचे भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. राजेद्रं विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, संचालक हभंप शांताराम जोरी, सरपंच सतिश जोशी आदिसह सभासद व ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.