संगमनेर Live | कोरोना काळात ज्यांनी माणसात देव बघून काम केले त्यांच्या नावाची नोंद इतिहास निश्चितचं होईल. संकट काळात समाज्यासाठी, गोर - गरिबासाठी काम करण्यातचं आगळे वेगळे पण असते, त्यातूनचं आपले पण निर्माण होते. जो स्वतःसाठी जगतो त्याची माती होते तर, समाज्यासाठी जगणाऱ्यांची इतिहासात नोंद घेतो.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे व कुटुंबिय यांनी समाज्यासाठी आयुष्य खर्ची घातल्यामुळेचं त्याना मोठेपण लाभले आहे. त्यामुळे चांगले काम करा, एक दिवस तुमचा निश्चित असेल असा विश्वास पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील काळू उर्फ संजय मुन्तोडे मित्र मंडळाने कोरोना काळात मृत्यू झालेल्या नागरीकाचा सामुहिक श्रद्धाजंली कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके बोलत होते.
यावेळी पठार भागाचे नेते गुलाबराव भोसले, अर्जुन मुन्तोडे, अनिल कोळपकर, संजय मुन्तोडे, दिनकर बोंद्रे, संदिप बोंद्रे, संतोष मुन्तोडे यांच्यासह कोरोना काळात मृत्यु झालेल्याचे कुटुंबिय व नातलग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार निलेश लंके पुढे म्हणाले की, कोरोनात मृत्यू झालेल्या नागरीकाचा सामुहिक श्रद्धाजंलीचा उपक्रम हा समाजासाठी सुत्य असून असा उपक्रम कोणीही आजपर्यत घेतला नसल्याचे सांगताना कोरोना काळात या तरुणानी स्व:ताला झोकून देत जे सामाजिक दायित्व निभावले त्याला तोड नाही असे म्हणत कौतुक केले.
चांगल्या कामामुळे टिका होते, टिका करण्याकडे कधी लक्ष न देता आपले मन काम करण्यात वळविल्यास मनाला समाधान मिळते. युवकांनी समाजहिताची चांगली कामे केली पाहिजेत त्यांची इतिहासात नोंद होत असते. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास बिनधास्त सांगा अडी - अडचणी दूर करु. असे आश्वासन शेवटी आ. निलेश लंके यांनी उपस्थिताना दिले आहे.
दरम्यान यावेळी संजय मुन्तोडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कोरोना संकट काळात आलेले अनुभव सागितले. तसेच कोरोना काळात मृत्यू पावलेल्या नागरीकाना सामुहीक श्रद्धाजंली कार्यक्रमानतंर या कुटुंबातील व्यक्तीना आंबा रोप आ. लंकेच्या हस्ते देण्यात आले व यानंतर गावात सामुदायिक वृक्षारोपन करण्यात आले.