◻शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आ. विखेचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
◻मंत्री आदीत्य ठाकरे यांची आ. विखे पाटील याना आली किव.?
◻नाव न घेता खा. संजय राऊत याचा घेतला समाचार
◻एसटी कर्मचारी व शेतकऱ्याच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारला फटकारले
संगमनेर Live | मास्क काढण्याचा निर्णय केल्याने मुख्यमंत्री आता जनतेला दिसतील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलते तरी होतील असा खोचक टोला आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावाला.
मुख्यमंत्र्यांनी मास्क काढून १४ तारखेच्या सभेत कोणाचेही मास्क उतरावेत याची चिंता आम्हाला नाही. परंतू आता त्यांनी मास्क काढण्याचा निर्णय केलाच असेल तर, राज्याच्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी बोलले पाहीजे आशी अपेक्षा व्यक्त करून आ. विखे पाटील म्हणाले की, राज्यात वीजेचा प्रश्न गंभीर होत आहे, गेली सहा महीने एसटी कामगारांचे आंदोलन सुरू होते, शंभरहून अधिक कामगारांनी आत्महत्या केल्या. नियमित कर्जफेड करण्याऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान खात्यात अद्यापही वर्ग नाही या सर्व प्रश्नांवर त्यांनी आता मास्क काढल्यानंतर बोलावे असे आ. विखे पाटील म्हणाले.
मंत्री आदीत्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर भाष्य करताना आ. विखे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची मला किव करावीशी वाटते. ते राजकारणात नवे आहेत, अजून त्यांना खुप धडे घेण्याची गरज आहे असा सल्ला देवून कोणी आयोध्येला चालले म्हणून मी ही आयोध्येत जाणार ही भूमिका घेवून हिंदूत्व सिध्द होत नाही. तुम्ही सत्ता टिकविण्यासाठी ज्या तडजोडी केल्या आहेत त्यावरुन राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यापध्दतीने हिंदूत्वाचा पुरस्कार केला त्याबद्दल लोकांच्या मनात आदर होता. त्यांनी सत्तेसाठी विचारांची तडजोड केली नाही. परंतू आजची शिवसेनेची परिस्थिती ही सत्तेसाठी तडजोड करणारी आहे. शिवसेनेचे प्रवक्ते रोज जो विधान करीत आहेत ते फक्त शिवसेना प्रमुखांचे विचार संपविण्यासाठीच असल्याचे आ. विखे पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजाराचे अनुदान देण्याचे सरकारने आतापर्यत तीनदा जाहीर केले. सरकार फक्त घोषणांचे गाजर दाखवते. शेतकऱ्यांची फसवणूक या सरकारने केली असल्याचा आरोप आ. विखे पाटील यांनी केला.