◻ लिव्हर ट्रान्सप्लांट शस्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन
◻ स्थानिक नागरीक व तरुणाच्या पुढाकारातून ३५ हजार रुपये झाले जमा
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल मोहन लक्ष्मण गव्हाणे हे लिव्हर सिरोसिसने आजाराने ग्रस्त असून नुकत्याच केलेल्या वैद्यकीय चाचण्यानमध्ये डॉक्टरांनी त्याना तात्काळ लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला आहे. या महागड्या शस्त्रक्रियेसाठी मोठी रक्कम लागणार असल्याने मुलगा सागर व योगेश गव्हाणे याच्यासह स्थानिक नागरीकानी दानशूर व्यक्तीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थाना अर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मागील काही वर्षांपासून मोहन गव्हाणे हे किडणीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्याच्यावर औरंगाबाद येथिल रुग्णालयात उपचार सुरु होते. महागड्या औषधोपचाराला लागणाऱ्या खर्चामुळे जेमतेम परिस्थिती असलेल्या गव्हाणे कुटुंबाचे कबरडे मोडले आहे.
तर नुकत्याच केलेल्या वैद्यकीय चाचण्यानमध्ये लिव्हर सिरोसिसने आजार बळावल्याने डॉक्टरांनी तात्काळ लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला गव्हाणे कुटुंबाला दिला आहे. या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे ३५ लाख रुपये खर्च येणार आहे. गव्हाणे कुटुंबाचे आतापर्यत ३ लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम औषध उपचारावर खर्च झाले आहेत. परिस्थिती जेमतेम असल्याने सध्या मोहन गव्हाणे याच्यावर लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आश्वीसह संगमनेर तालुक्यात गव्हाणे यांच्या दुर्धर आजाराबाबतची माहिती तसेच कुटुंबाची असलेली परिस्थिती सोशलमीडियाच्या माध्यमातून लोकानपर्यत पोहचत असल्याने अनेक संवेदनशील नागरीकानी व आश्वी खुर्द ग्रामस्थानी जमेल तितकी मदत देऊ केल्याने दोन दिवसात त्याच्याकडे ३५ हजार रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. तर पैशाअभावी उपचार करण्यासाठी हतबल झालेल्या गव्हाणे कुटुंबाने अर्थिक मदत करावी असे समाजातील दानशुर व्यक्तीना आवाहन केले आहे.
दरम्यान अर्थिक मदतीसाठी मुलगा सागर गव्हाणे व योगेश गव्हाणे याच्यां 9766882284 , 8600827873 मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे अथवा अर्थिक मदत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.