◻ प्रकृत्ती अस्वस्थ असल्याने महाराजानी पत्रक काढले
संगमनेर Live | समाज प्रबोधनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे ३० मेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याबाबत त्यांनी एक पत्रक काढून माहिती दिली.
समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा विश्राम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे त्यांचे २३ मे ते ३० मेपर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
इंदोरीकर महाराजांचे किर्तन ऐकणाऱ्याची मात्र या बातमीमुळे काळजी वाढली असली तरी, पण आता पुढचे काही दिवस त्यांचे किर्तन ऐकता येणार नसल्याने निराशेचे वातावरण आहे.
इंदोरीकर महाराज यांचे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी किर्तनाचे कार्यक्रम होते. पण इच्छा असूनही महाराज कार्यक्रमास येऊ शकत नसल्याने आयोजकांची मोठी गैरसोय झाली आहे. यासंबंधी इंदोरीकर महाराजांनी मनापासून दिलगीरी व्यक्त केली असून त्याबाबत पत्रक जारी केले आहे.
दरम्यान वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत रूजू होणार असल्याने प्रेम व आशिर्वाद सदैव पाठीशी लाभावे अशी अपेक्षा त्यांनी पत्रामध्ये व्यक्त केली आहे.