◻१३ - ० अशा मोठ्या फरकाने सर्व उमेदवार विजयी
◻ आ. विखे पाटील याच्या दोन गटात झालेल्या तुल्यबळ लढतीकडे लागले होते पंचक्रोशीचे लक्ष
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिक्षठेची व राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेल्या प्रतापपूर सेवा सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील याना माननाऱ्या दोन गटात अतिशय तुल्यबळ झाली.
यामध्ये आ. विखे पाटील यांचे खंदे समर्थक व आ. राधाकृष्ण विखे पाटील ट्रक वाहतूक सोसायटीचे माजी संचालक भगवानराव इलग याच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने १३-० असा मोठ्या फरकाने विजय संपादित केला आहे.
यावेळी झालेल्या निवडणूकीत सर्वसाधारण प्रवर्गातून गजानन कारभारी आव्हाड (२०८), दादा नाना आंधळे (२०६), सखाराम आनंदा आंधळे (२२२), हरिभाऊ कारभारी आंधळे (२२२), दादा सखाराम इलग (१९७), शिवाजी भगवानराव इलग (२२५), बबन कारभारी घुगे (२१४) व एकनाथ आनंदा सांगळे (१८५) विजयी झाले आहेत.
महिला राखीव प्रवर्गातून रुख्मिणीबाई सुखदेव आंधळे (२२५) व शांताबाई रामदास गिते (१९८) या विजयी झाल्या असून भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्गातून दिलीप सोमनाथ आंधळे (२००) हे विजयी झाले असून इतर मागास प्रवर्गातून अशोक मारुती बिडवे व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून शंकर गोधाजी खामकर हे दोन उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहेत. त्यामुळे प्रतापपूर सेवा सोसायटीत १३ - ० असा विजय झाल्याने जनसेवा मंडळाकडून जल्लोश करण्यात आला आहे.
दरम्यान सर्व विजयी उमेदवाराचा माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यानी संत्कार केला असून माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त राजेद्रं विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, ट्रक वाहतूक संस्थेचे चेअरमन नदूं राठी, व्हा. चेअरमन सुनिल जाधव, प्रवरा कारखाण्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू पाटील, मा. व्हा. चेअरमन कैलास तांबे, प्रतापपूर येथिल जनसेवा मंडळाचे मार्गदर्शक व जेष्ठ नेते भगवानराव इलग यानी अभिनंदन केले आहे.