◻ सर्पमित्र शिवाप्रसाद पवार व वनविभागाने केले अजगराला निसर्गात मुक्त
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटालगत सोमवारी मध्यरात्री ९ फूट लांबी व ७ किलो वजन असलेला अजस्त्र अजगर आढळला असून सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने वनविभागाच्या मदतीने या अजगराला निसर्गात मुक्त केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास विशाल नामदेव शिदें हे वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल नवरत्न येथून जात असताना एक मोठा साप रस्ता ओरडताना दिसला. त्यामुळे परिसरातील नागरीकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून शिदें यानी स्थानिक नागरीकाना याबाबत माहिती देऊन सर्पमित्र शिवाप्रसाद पवार याला संपर्क केला.
मध्यरात्री झाली असतानाही घटनेचे गांभीर्य ओळखत सर्पमित्र शिवाप्रसाद पवार ऐ घटनास्थळी दाखल झाले. थोड्या वेळातचं मोठ्या शिताफीने या सापाला ताब्यात घेऊन हा अजगर असल्याची माहिती उपस्थिताना दिली.
दरम्यान मंगळवारी सकाळी वनक्षेत्र अधिकारी एस. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बबन मंचरे व वनरंक्षक रामकृष्ण सांगळे यानी या अजगराला ताब्यात घेऊन हा ३ वर्ष वय असलेला मादी अजगर असल्याची माहिती दिली व सर्पमित्र शिवाप्रसाद पवार व डॉ. अनिल क्षिरसागर यांच्या मदतीने त्याला निसर्गात मुक्त केले आहे. याप्रसंगी पत्रकार संजय गायकवाड आदिसह परिसरातील नागरीक उपस्थित होते.