◻ दोन शेळ्या घेऊन बिबट्याने केले पलायन
◻ शेतकऱ्याचे अंदाजे ८० हजाराचे नुकसान
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारातील शामराव कारभारी पाबळ याच्या वस्तीवर सोमवारी पहाटे बिबट्याने हल्ला करुन त्याच्या ७ शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. यामुळे पाबळ यांचे अंदाजे ८० हजार रुपये अर्थिक नुकसान झाले असून त्याना भरपाई देण्याची मागणी केली आहे. नर व मादी बिबट्या तसेच त्याची दोन पिल्ले या परिसरात वावरत असल्याचे नागरीकाचे म्हणने असल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे.
शामराव पाबळ याच्यां शेळ्या घराशेजारी पत्रा शेड व सात फुटी जाळीच्या कंपाऊडमध्ये सुरक्षित होत्या. रविवारी रात्रभर पाऊस सुरु असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. पाऊस व अंधाराचा फायदा घेवून बिबट्याने सात फुटी जाळीवरुन पत्र्याच्या शेड मध्ये प्रवेश केला होता. यामध्ये बांधलेल्या लहान मोठ्या ७ शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवून त्याना ठार केले व एक बोकड व एक पाठ घेवून बिबट्याने पोबारा केला.
पाबळ कुटुंबिय सकाळी ५.३० वा उठल्यानंतर शेडमधील दृष्य पाहून त्याना मोठा धक्का बसला. सुमारे ८० हजार रुपये किमंतीच्या शेळ्या ठार झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहीले आहे.
बिबट्याने सात शेळ्याची शिकार केल्याची वार्ता परिसरात पसरल्याने शामराव पाबळ यांच्या वस्तीवर नागरीकानी मोठी गर्दी केली होती. या गरीब शेतकर्याच्या सात शेळ्या बिबट्याने ठार झाल्याने त्याना अश्रु आवरता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे वनपाल सुहास उपासने, वनरक्षक हरिचंद्र जुंजार, वनरक्षक पोपटराव गागरे यांनी घटनास्थळी तातडीने येवून पंचनामा केला. तसेच मंडळ आधिकारी वर्षा पवार यांनी या घटनेची माहीती घेतली आहे.
दरम्यान पानोडी व शिबलापूर परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर असून दोन पिल्लासह नर व मादी बिबट्या संचार करत असल्याने मोठी दहशत निर्माण झाल्याचे नागरीकाचे म्हणने आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी डॉ. संजय सांगळे, बापूसाहेब पाबळ, रावसाहेब नागरे, शामराव पाबळ, बाळासाहेब पाबळ आदिनी करुन पाबळ कुटुंबाला अर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे.