◻ मते शिवसेनेच्या बापाच्या नावाने मागू नका, तर स्वतःच्या बापाच्या नावाने मागा.
◻ ..या शिवसेनेच्या प्रतिक्रेयेला शिदें गटाने उत्तर देताना दिला आ. विखे पाटील यांचा दाखला
◻ आ. विखे पाटील याच्यां कामाना मतदार संघात नो - चॅलेंज
संगमनेर Live | मते मागताना शिवसेनेच्या बापाच्या नावाने मागू नका, तर स्वत:च्या बापाच्या नावाने मागा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली होती. त्याला शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्त्युत्तर दिले असून लोक फक्त शिवसेनेच्याच चिन्हावर निवडून येत नाहीत. तसे असते तर शिवसेनेचे सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या असत्या, असे म्हटले आहे.
तर मते ही केवळ शिवसेनेच्या नावेच मिळत नाहीत, असाच अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे. उमेदवाराचे सुद्धा त्यात श्रम असतात अधिक पक्षाची मते असतात. अशी मते प्रत्येक पक्षाकडे असतात. जशी ती शिवसेनेकडे आहेत, तशी ती काँग्रेसकडे आहेत, राष्ट्रवादीकडे आहेत, तशीच ती भाजपाकडेही असल्याचे केसरकर म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, आम्ही सध्या कोणाच्याच नावावर मते मागितली नाहीत, कारण अडीच वर्षानंतर निवडणुका आहेत. आम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नाही. आपल्या विधानसभेत जवळपास ८० ते १०० आमदार असे आहेत, जे कोणत्याही पक्षाकडून लढले तरीही निवडून येतील.
राधाकृष्ण विखे पाटील हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आधी ते काँग्रेसमधून निवडून आले, नंतर भाजपात गेले. तिथेही निवडून आले. असे उमेदवार असतात. कारण त्यांचे काम त्यांच्या मतदारसंघात, जिल्ह्यात असते. आपण त्याला चॅलेंज करू शकत नसल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे सध्याच्या गोधंळलेल्या राजकीय परिस्थितीत भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील राज्याच्या राजकारणात पुन्हा केद्रंस्थानी आल्याची चर्चा मतदार संघात सुरु झाली आहे.