◻ महाराष्ट्रात सत्तांतर होण्याचे डॉ. विखे पाटील यानी दिले संकेत
संगमनेर Live (राहुरी) | पंढरीचा पांडुरंग नेहमी योग्य माणसाला आषाढीच्या पूजेसाठी बोलावत असतो. यावर्षीही योग्य माणसाच्या हस्तेच पंढरीच्या पांडुरंगाची पूजा होईल. याबाबत सर्वांनी निश्चित राहावे, हे ठरवणारे आपण नाही तर पांडुरंगच आहे. असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सत्तांतर होण्याचे संकेत दिले आहे.
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचे प्रस्थान होण्याआधी पालखी पूजन खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्तें नुकतेच पार पडले. यावेळी श्री संत कवी महिपती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांच्यासह ट्रस्टचे सर्व विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या महामारी मुळे गेली दोन वर्षापासून दिंडी सोहळा बंद होता. मात्र आता या वर्षी पांडुरंगाला भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी जात आहेत. या वारकऱ्यांची व दिंडीची व्यवस्था व्हावी म्हणून गेली काही दिवसापासून मी प्रयत्न करत आहे. नगर मनमाड रोड व नगर ते करमाळा हा सर्व मार्ग सध्या काम सुरू असल्याने अडथळ्याचा बनला आहे. मात्र मी केंद्राकडून तातडीने १३ कोटी रुपये मंजूर करून घेऊन दिंडीसाठी ज्या ठिकाणी काम सुरू आहेत त्या ठिकाणी तातडीने मुरमीकरण करून मार्ग उपलब्ध करून देणे संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत.
खांदलेले रस्ते त्यामुळे दुरुस्त होऊन या मुरमीकरण केलेल्या रस्त्यावरून दिंडी जाऊ शकते व त्यामुळे अनेक अपघात होण्याचे वाचतील. त्याच बरोबर वारकऱ्यांना देखील जाण्यासाठी योग्य मार्ग मिळेल. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघता वारकऱ्यांनी यामध्ये लक्ष न देता पांडुरंगाचा धावा करावा. पांडुरंगाच्या मनामध्ये जो असतो त्या माणसाच्या हस्तेच दरवर्षी आषाढीची महापूजा होत असते. यावर्षीदेखील योग्य माणसाला पांडुरंग नक्कीच आपल्या सेवेसाठी बोलावून घेणार आहे. वारकऱ्यांसाठी करता येईल तेवढा सर्व सुविधा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
यावेळी डॉ. विखे यांनी ताहराबाद येथील पालखी मार्गासाठी २५ लक्ष रुपये देण्याचे घोषित केले त्याच बरोबर या संस्थांनसाठी तातडीने रुग्णवाहिका देखील देण्यात आली. त्याच बरोबर या संस्थांनसाठी जेवढे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केले असा शब्द दिला.
दरम्यान यावेळी प्रास्ताविकामध्ये ताहाराबाद गावचे सरपंच नारायण झावरे यांनी सांगितले की, विखे घराण्याने श्री संत महिपती महाराज ट्रस्ट साठी आजपर्यंत मोठे योगदान दिलेले आहे. या संस्थांनचे माध्यमिक विद्यालय आमदार राधाकृष्ण विखे पाटील शिक्षण मंत्री असताना ग्रँड टेबल झालेले आहे. त्याच बरोबर सुमारे ३० लाख रुपयांचे पेवर ब्लॉक देऊन विखे घराणे संस्थांना मदत केली आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिका पालखी रस्ता तसेच पाणी योजनेला तीस लाख रुपये दिले. त्यामुळे पाणी योजना देखील सुरू आहे. याचे सर्व श्रेय विखे घराण्याला जाते आम्ही सदैव त्यांचे ऋणी आहोत.
यावेळी संत कवी महिपती महाराज ट्रस्टचे उपाध्यक्ष अविनाश कांबळे, ज्येष्ठ विश्वस्त आसाराम ढुस, सुरसिंगराव पवार, मच्छिंद्र कोहकडे, शिवाजी कोळसे, दत्तात्रेय जगताप, अशोक हांडे, संजय कांबळे, रमेश नालकर, बाबासाहेब वाळुंज, अँड. अशोक किंनकर, श्रीकृष्ण कांबळे, संस्थानचे सचिव बाळासाहेब मुसमाडे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक केशवराव कोळसे, बाळकृष्ण कोळसे, मधुकर पवार, मच्छिंद्र तांबे, शिवाजी सयाजी गाडे, उत्तमराव आढाव,
गोरक्षनाथ तारडे, मुळा प्रवराचे संचालक रावसाहेब तनपुरे, शिवाजी सागर, पंचायत समितीचे माजी सभापती भीमराज हारदे, दिंडीप्रमुख ह.भ.प. नाना महाराज गागरे, पंचायत समितीच्या सदस्य मनीषा ओहोळ, ताहाराबादचे सरपंच नारायण झावरे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, साहेबराव म्हसे, कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे, प्रभाकर कोळसे, ज्ञानेश्वर कोळसे, सुखदेव मुसमाडे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ वारकरी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***फोटो सौजन्य - परेश कापसे