◻ अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
◻ पोलीसाकडून शिर्डीतील १३३ हॉटेलची झाडाझडती
◻ मोठ्या शिताफीने आरोपीला घेतले ताब्यात
संगमनेर Live | पंजाब पोलीसाना चकवा देत शिर्डी येथे लपून बसलेला सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यानी कारवाई करुन जेरबंद केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जालंधर विभाग क्र. २ पोलीस स्टेशन, (पंजाब) गु. र.नं. ५६/२०२२ भादविक ३०७, १४८, ९ ४ ९ सह आर्म अँक्ट २५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी पुनित ऊर्फ पिम्पु बलराज सोनी (वय - २७, रा. घ. नं. २६२ रोड नंबर - ५, शहिद बाबुलालसिंग नगर, जालंधर, राज्य पंजाब) हा गुन्हा केल्यापासुन आपले स्वतःचे अस्तित्व लपवुन, वेळोवेळी राहण्याची ठिकाणे बदलुन विविध ठिकाणी राहत होता. पंजाब पोलीसांनी प्रयत्न करुन तो मिळुन येत नव्हता. 
त्यामुळे पोलीस कमिशनर जालंधर, पंजाब येथील गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक इंद्रजीत सिंह यांनी पोलीस महासंचालक मुंबई यांचे कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन या फरार आरोपीचा शोध घेवून कारवाई करणे बाबत विनंती केली होती. पोलीस महासंचालक यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना फरार आरोपीचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे विशेष पथक नेमुन कारवाई करणे बाबत योग्य त्या सुचना केल्या होत्या.
वरिष्ठाच्या सुचना मिळताचं स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सोमनाथ दिवटे, पोलीस फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, दत्ता हिंगडे, विजय वेठेकर, संदीप पवार, पोलीस नाईक भिमराज खर्से, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव व चापोहेकॉ बबन बेरड, अर्जुन बडे यांचे पथक आरोपींचा कसून शोध घेत होते.
याचंकाळात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयीत व्यक्ती शिर्डी येथील हॉटेल मध्ये राहत आहे. त्यामुळे माहिती मिळताचं पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दोन विशेष पथकांना सोबत घेवून शिर्डी परिसरातील १३३ हॉटेलची तपासणी केली. तपासणी दरम्यान हॉटेल निर्मल इन लॉज मध्ये जालंधर पोलीसांकडुन प्राप्त माहितीनुसार एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जसप्रितसिंग भुलाव (रा. जालंधर, पंजाब) असे सांगितले. त्याची कसुन चोकशी करताचं त्याने त्याचे खरे नाव पुनित ऊर्फ पिम्पु बलराज सोनी असल्याचे सांगितले. तर चौकशी दरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत पंजाब पोलीसाना माहिती देण्यात आली असून माहिती मिळताचं विशेष पथकाने तात्काळ शिर्डी येथे येवून आरोपीस पुढील कारवाई करीता घेवून गेले आहेत.
दरम्यान ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सोमनाथ दिवटे, पोलीस फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, दत्ता हिंगडे, विजय वेठेकर, संदीप पवार, पोलीस नाईक भिमराज खर्से, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव व चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन बेरड, अर्जुन बड़े याच्यां पथकाने केली आहे.