संगमनेर Live | ३० के. एल. पीडी क्षमतेचा डिसलरी व इथेनॉल प्रकल्प उभारणीचा निर्णय घेणाऱ्या राज्यातील मोजक्याच्या साखर कारखान्यापैकी श्री गजानन महाराज शूगर लि. असून बहुतांश साखर कारखान्यांने भूमिपूजन करुन प्रकल्पास विलंब करताना दिसत आहेत. मात्र माझ्या सभासद, आधिकारी व कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमामुळेचं हा प्रकल्प ७ महीन्यातचं उभा राहून पठार भागासह परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन श्री गजानन महाराज शुगर लि. चे संस्थापक चेअरमन रवीद्रं बिरोले यांनी दिले.
संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथील श्री गजानन महाराज शूगर लि. च्या ३० के. एल. पी. डी. क्षमतेचा डिसलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या भूमीपूजन प्रसंगी रवीद्रं बिरोले बोलत होते. यावेळी बिरोले यानी सपत्नीक पूजा केली.
याप्रसंगी संचालिका सौ. आश्विनीताई बिरोले, शंतनू बिरोले, नंदन बिरोले, सौ. ईशा बिरोले, ॲड. रामदास शेजूळ, सुभाषराव कोळसे, हरिभाऊ गीते, केरुबापू मगर, बाळासाहेब खेमनर, जनरल मॅनेजर बबनराव पवार, वर्क्स मॅनेजर अनिल वाकचौरे , सचिन देशमाने, अजीत गुळवे, नितेश रणवारे, श्रीकांत इंगळे, बाळासाहेब डेरले, विजय खरात, गोरक्षनाथ डहाळे, देवीदास लाड, राहुल कमादार, विजयकुमार जाधव, बाबाजी सागर, गुलाबराव भोसले, योगेश खेमनर, पप्पू खेमनर,
कैलास डोंगरे, लक्ष्मण गीते, संरपच राहुल गंभीरे, लालू शेख, संदिप पंचपिंड, सुभाष खेमनर, शिवाजी भोसले, सुनिल गीते, संतोष खेमनर, योगेश डोंगरे, भाऊसाहेब बागुल, प्रकाश काकडे, भास्कर शिंदे, पांडूरंग काकडे, विठ्ठल तमनर, हरि काळे, शेषराव पाटील, जीवन आहेरे, समाधान पाटील, पत्रकार राजेंश गायकवाड, टेक्नीकल मार्गदर्शक वसंत गोंदकर, ओमराज सन व्यवस्थापक प्रकाश सोनवणे आदिसह सभासद, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी रवीद्रं बिरोले पुढे म्हणाले की, ८ वर्षापुर्वी या माळरानावर निसर्ग हरवलेला दिसला. मात्र श्री गजानन महाराज यांच्या आशिर्वादाने साखर कारखाना उभा राहील्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. हाताला रोजगार मिळाला हळुहळु निसर्ग फुलू लागला असून या परिसरात विकासाची घौडदौड मोठ्या प्रमाणात करायची आहे. डिसलरी व इथेनॉल प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होवून विकासाला चालना मिळाणार असल्याचे यावेळी त्यांनी सागितले.