संगमनेर Live (लोणी) | सेवा, सुशासन व गरीब कल्याण अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश बावके, सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन जनसेवा कार्यालय लोणी येथे केले होते.
या बैठकीत विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच युवा मोर्चा मध्ये नवीन युवकांना कशा पद्धतीने जोडता येईल त्यांना संधी कशी देता येईल या संदर्भात खासदार डॉ. विखे यानी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी युवा मोर्चा च्या सर्व कार्यकारणी च्या वतीने खा. डॉ. विखे पाटील यांचा संत्कार करण्यात आला. यावेळी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीशराव बावके पाटील, अतुल बोठे, महेश वाघे, हृषीकेश खांदे, मनोहर मते, मिलिंद बनकर, नवनाथ मुजमुले, गिरीश वाबळे, बाप्पू वाणी, परवेज पटेल, राहुल बावके, उमेश कासार, शुभम आहेर, राहुल गोरे, गणेश आहेर, राजू इनामदार, उद्धव धनवटे, राहुल शेळके, साईनाथ खर्डे, ललित शिंदे, निखिल निर्मळ, नितीन कुदळे, शरद खर्डे, धनंजय निबे, मनोज लोखंडे, मनेश चांगले आदि पदाधिकारी उपस्थित होते.
छायाचित्र :- परेश कापसे