◻ संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारातील घटनेने तालुका हादरला
◻ दोन जण जखमी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी शिवारात असलेल्या तारामळी वस्ती येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने घर पडून तीन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अकलापूर गावांतर्गत असलेल्या मुंजेवाडी परिसरातील तारामळीवस्ती येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे घर पडून विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय - ७५), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय - ६५) साहील सुभाष दुधवडे (वय - १२) हे तीघे जण जागीच ठार झाले आहे
तर वनीता सुभाष दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर घटनेची माहिती घारगाव पोलीसांना देण्यात आली.
त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल आदीनाथ गांधले, संतोष खैरे, गणेश लोंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली सरपंच आरूण वाघ, भास्कर देवकर, संतोष देवकर, संपत आभाळे, संजू देवकर, दिनकर आभाळे, संतोष गाडेकर, लहू आभाळे, आशोक वाघ, पांडू देवकर, जनार्दन गायकर, संतोष गायकर, रवी गायकर आदिंनी घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्या खालून सर्वाना बाहेर काढण्यात आले.
दरम्यान यामध्ये तीन जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला आहे. तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांनीही घटनास्थळी दाखल झाले होते.