◻ राज्य सरकारलाचं बुस्टर डोस देण्याची आली वेळ
◻ आ. विखे पाटील यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आश्वी बुद्रुक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर Live | सहकारी बॅकांमधूनही कोअर बॅकींगची सुविधा मिळण्यासाठी रिझर्व्ह बॅकेने अटी शिथील कराव्यात अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे आपण केली असून, लवकर याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रवरा सहकारी बॅकेच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील शाखेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन आ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने केंद्र सरकारच्या योजनेतून २६ शेतकऱ्यांना मंजुर झालेल्या कृषि औजारांचे वितरण तसेच स्व. गोपीनाथ मुंडे मोफत अपघात विमा योजना, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास अँड. शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठनेते आण्णासाहेब भोसले, बॅकेचे चेअरमन अशोकराव म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहीणीताई किशोर निघुते, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, गटविकास आधिकारी अनिल नागणे, निवृत्ती सांगळे, दिपाली डेंगळे, रामभाऊ भुसाळ, नंदू राठी, भगवानराव इलग, शांताराम जोरी, अँड. अनिल भोसले, विजय शेळके, मकरंद गुणे, विजय गायकवाड, प्रा. कान्हू गिते, जेहूरभाई शेख, रावसाहेब जोशी, सरपंच सतीष जोशी, लक्ष्मण उगलमुगले, मच्छिद्रं भागवत, शिवाजीराव इलग, सचिन शिदें, सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनील मांढरे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात आ. विखे पाटील म्हणाले की, बॅकेच्या सेवांचे मापदंड आता बदलत चालले आहेत. सहकारी बॅकापुढे आव्हान असले तरी, सामान्य माणसाला या सहकारी बॅकानीच मोठा आधार दिला. आज राष्ट्रीयकृत बॅकांच्या बरोबरीने सहकारी बॅकांची प्रगती सुरु आहे. ऑनलाईन बॅकींगची सुविधा आता सर्वत्र सुरु झाली. कोअर बॅकींगची सुविधाही सहकारी बॅकांमधुन मिळावी अशी मागणी होत आहे. परंतू रिझर्व्ह बॅकेच्या असलेल्या अटींमुळे सहकारी बॅकांना ही सुविधा देण्यापासुन वंचित राहावे लागत आहे. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे आपण पाठपुरावा केला असून, लवकरच याचा निर्णय होईल अशी अपेक्षा आ. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात बोलून दाखविली.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशात सुरु केलेली व्यक्तिगत लाभाची प्रत्येक योजना बॅकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळत आहे. यासाठी जनधन योजना त्यांनी सुरु केली. आज तीन कोटीहून अधिक खाते बॅकेंत उघडली गेल्याने सामान्य माणूस बॅकेच्या प्रवाहाशी जोडला गेला आहे. याचा परिणाम समाजामध्ये सकारात्मक झाला आणि योजनांमधील भ्रष्टाचारालाही आळा बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आश्वी महसुल मंडळातील प्रत्येक गावामध्ये प्रभावीपणे होत आहे. कोव्हीड संकटात आणि त्यानंतरही मोदीजींनी घेतलेले निर्णय समाजहीताचे ठरले. राज्य सरकार मात्र फक्त केंद्र सरकारवर अवलंबून राहत आहे. आता बुस्टर डोसही केंद्राने द्यावा अशी मागणीही सरकारमधील मंत्रीच करु लागले आहेत. आता या सरकारलाच बुस्टर देण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळीग्राम होडगर म्हणाले की, आ. विखे पाटील यांचे नेतृत्व हे संवेदनशिल आहे. कोणत्याही प्रश्नासाठी पाठपुरावा करुन, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका ही सातत्याने असते. गेली अनेक वर्षे हा परिवार लोकांच्या सुख - दुखात सहभागी होवून सामाजिक दायित्वाची भूमिका बजावतो त्यामुळेच अशा व्यक्तिमत्वांचे वाढदिवस हे मंगलमय होतात. अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमास सर्व संस्थाचे संचालक, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.