संगमनेर Live | पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सुरु केलेल्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी ही खऱ्याअर्थाने नव्या भारताच्या विकासाचे पडलेले पाऊल आहे. केंद्र सरकारच्या योजनांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरु करण्यात आलेले सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व हे सेवापर्व ठरावे म्हणून वाढदिवस सर्व लाभार्थ्यांना समर्पित करीत असल्याची भावना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राहाता तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिव्यांग व्यक्तिंसाठी सुरु केलेल्या योजनेच्या नोंदणीचा शुभारंभ प्रातिनिधीक स्वरुपात लोणी येथे करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या वतीने कामगारांसाठी सुरु करण्यात आलेल्या अटल विश्वकर्मा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना साहित्यांचे वितरण आ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उपाध्यक्ष अशोक पवार, प्रांताधिकारी गोंविंद शिंदे, तहसिलदार कुदंन हिरे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, डॉ. तनपुर कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अॅड. तान्हाजी धसाळ, सभापती नंदाताई तांबे, वंतराव देशमुख यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आ. विखे पाटील यांचा जिल्ह्याच्या वतीने सत्कार केला. आ. विखे पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते लोणीमध्ये आले होते.
आपल्या भाषणात आ. विखे पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्ष पुर्ण होत आहे. या सर्व कार्यकाळात सुरु केलेल्या योजनांची केवळ घोषणा नाही तर अंमलबजावणी सुरु आहे. नव्या भारताच्या विकासाचे हे पर्व मोदीजींच्या नेतृत्वाखाली साध्य होत असल्याचा गौरव करुन, पंतप्रधान ख-याअर्थाने आता विश्वनेते झाले असल्याचे त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
देहू येथे मोदीजींनी केलेल्या भाषणाचा दाखला देवून आ. विखे पाटील म्हणाले की, संत तुकारामांनी आपल्या अंभगातून जो मानवी कल्याणाचा संदेश दिला त्याप्रमाणे समाजातील रंजल्या गांजल्यांची सेवा करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असल्याकडे लक्ष वेधून शिर्डी मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणि जनसेवा फौंडेशन माध्यमातून सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी वयोश्री योजनेची कार्यवाही झाली. आता दिव्यांग व्यक्तिंसाठी योजनेची नोंदणी आजपासुन सुरु झाली आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघ सर्व लाभांच्या योजनांमध्ये आणि विकास कामांमध्ये अग्रेसर आहे. जनतेने सातत्याने दिलेले पाठबळ हेच या विकास प्रक्रीयेला कारणीभूत ठरत असून, येणाऱ्या काळात ही विकासाची प्रक्रीया अशीच निरंतर सुरु राहणार असल्याची ग्वाही देवून आ. विख पाटील म्हणाले की, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कालच देशातील युवकांना लष्करामध्ये नोकरीच्या संधी देण्यासाठी अग्निपथ योजना जाहीर केली. लष्कराच्या तीनही दलात ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या संधी आता मिळणार आहेत. या दृष्टीने युवकांना मार्गदर्शन होण्यासाठी शिर्डी मतदार संघात आता अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षा आणि नोकरीसाठी आवश्यक असे मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सुरु करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
लोणी बुद्रूक गावचे ग्रामदैवत श्री. म्हसोबा महाराज यांना आ. विखे पाटील यांनी सपत्नीक अभिषेक केला. कारखाना कार्यस्थळावर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळास त्यांनी अभिवादन केले. लोणी बुद्रूक येथील युवक कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करीत आ. विखे पाटील यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सनी विखे, प्रा. भाऊसाहेब विखे, शंकर विखे, लक्ष्मीकांत असावा, पंकज विखे, मयुर विखे, ऋषी तांबे, अनिकेत विखे, विजय पवार, सिध्दांत मिसाळ अजय नागरे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, शालेय साहित्याचे वाटप या निमित्ताने करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनते प्रविण दरेकर, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, आ. अभिमन्यू पवार, माजीमंत्री मधुकरराव पिचड, खा. सदाशिव लोखंडे, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे, आ. रोहीत पवार आदींसह केंद्र आणि राज्यातील अनेक मान्यवर नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यीक, कलाकारांनी दुरध्वनी वरुन तसेच व्टिटर संदेशाव्दारे आ. विखे पाटील यांचे अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या.