सरकारच्या निष्‍क्रीयतेमुळे विकास प्रक्रीयेत राज्‍य पिछाडीवर - आ. विखे पाटील

संगमनेर Live
0
अपयश झाकण्‍यासाठी सत्‍ताधारी पक्षाचे नेते मोर्चे आणि आंदोलनं करतायत

◻महाविकास आघाडी सरकारवर आ. विखे पाटील यांची घणाघाती टिका 

◻पंतप्रधान देशाच्‍या मागे खंबीरपणे उभे राहील्‍यामुळेच कोव्‍हीड संकटातून देश वाचला

संगमनेर Live (शिर्डी) | आपले अपयश झाकण्‍यासाठी सत्‍ताधारी पक्षाचे नेते मोर्चे आणि आंदोलनं करुन, जनतेचे लक्ष विचलीत करीत आहेत. केवळ स्‍वार्थासाठी एकत्रित आलेले तीन पक्षांचे मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्‍न विसरले आहेत. त्‍यांच्‍या निष्‍क्रीयतेमुळेच विकास प्रक्रीयेत राज्‍य आज पिछाडीवर गेले असल्‍याची घणाघाती टिका आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

शिर्डी शहरातील सुमारे ११ कोटी ५७ लाख रुपयांच्‍या निधीतून विकसीत होत असलेल्‍या कामाची भूमिपुजन आणि ७ कोटी रुपये खर्चाच्‍या नॅचरल गॅस लाईनच्‍या कामाचा प्रारंभ आ. विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. तसेच केंद्र सरकारने जेष्‍ठ नागरीकांसाठी सुरु केलेल्‍या राष्‍ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्‍यांना साधन साहित्‍य आणि आयुष्‍यमान भारत योजनेतील नागरीकांना कार्डचे वितरण आ. विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार वैभराव पिचड, माजी नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर, शिवाजीराव गोंदकर, कैलास कोते, अभय शेळके, भाजपाचे शहर अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, विजयराव कोते, राजेंद्र कोते, सचिन कोते, मंगेश त्रिभूवन, सुजीत गोंदकर, विलासराव कोते यांच्‍यासह विविध क्षेत्रातील मान्‍यवर मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात आ. विखे पाटील म्‍हणाले की, राज्‍य सरकारचा कारभार फक्‍त भगवान भरोसे सुरु आहे. सर्वकाही केंद्राने द्यावे ही अपेक्षा बाळगुण सरकार काम करीत आहे. कोव्‍हीड संकटातही सरकारची हीच आवस्‍था होती. केवळ नरेंद्र मोदीजींसारखे पंतप्रधान देशाच्‍या मागे खंबीरपणे उभे राहील्‍यामुळेच कोव्‍हीड संकटातून हा देश वाचू शकला. जगामध्‍ये इतर देशांची झालेली आवस्‍था पाहाता कोव्‍हीड संकटातील मोदीजींचा प्रत्‍येक निर्णय हा समाजहिताचा ठरला असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले.

केंद्र सरकारने सामान्‍य माणसाला केंद्रीभूत माणून प्रत्‍येक योजना सुरु केली आहे. केवळ घोषणा नाही तर थेट अंमलबजावणी हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्‍यामुळेच कोणत्‍याही योजनेचा लाभ लाभार्थ्‍यांना थेटपणे मिळत आहे. केंद्र सरकारच्‍या धोरणामुळेच कृषि क्षेत्राला दिशा मिळाली असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे. केवळ व्‍यक्तिव्‍देशाच्‍या भावनेतून पंतप्रधानांवर टिका करणे एवढाच कार्यक्रम फक्‍त राज्‍यातील सत्‍ताधाऱ्यांकडे उरला आहे. सर्वच बाबतीत अपयशी ठरल्‍याने सरकारमधील मंत्री उघडे पडले आहे. हे अपयश झाकण्‍यासाठी सत्‍ताधारी पक्षच आता रस्‍त्‍यावर उतरुन आंदोलन करु लागल्‍याची केविलवाणी अवस्‍था जनतेला पाहावी लागत असल्‍याची आ. विखे पाटील यांनी केली.

सत्‍ता असो अथवा नसो शिर्डीच्‍या विकासाला कोणताही निधी कमी पडू दिला नाही. शिर्डीचा चेहरामोहरा बदलल्‍याने राज्‍य आणि देशपातळीवर नगर परिषदेचा झालेला गौरव ही बाब प्रत्‍येक शिर्डीवासीयांचा अभिमान वाढविणारी आहे. किरकोळ घटनांवरुन राजकारण करणाऱ्यांना जनता थारा देत नाही. विकासालाच पाठबळ मिळत असल्‍याने यापेक्षाही अधिक चांगला विकास या शहराचा  सर्वाना बरोबर घेवून करायचा असल्‍याचे आ. विखे पाटील म्‍हणाले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !