हभंप उध्दवजी महाराज मंडलिक व डॉ. संजीव लोखंडे याच्यां हस्ते होणार उध्दघाटन
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय येथे हभंप उध्दवजी महाराज मंडलिक व डॉ. संजीव लोखंडे याच्यां हस्ते सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधानी युक्त नेत्ररोग बाह्यरुग्ण विभाग व ऑपरेशन थिएटरचे शनिवारी (दि. २ जुलै) सकाळी ११ वा. उध्दघाटन होणार आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एकलव्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे भुषवणार आहेत. यावेळी डॉ. जैनेंद्र राहुड, डॉ. सौ. तेजस्विनी राहुड, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. श्रीरंग छापेकर, आण्णासाहेब बलमे, डॉ. मंदार भणगे, डॉ. अविनाश जाधव,
डॉ. स्मिता कोलते, डॉ. जनाबाई आव्हाड, डॉ. निलम हांडे, डॉ. कुलदीप राजपूत, डॉ. निशांत इंगळे, डॉ. विनायक चकोर, डॉ. विक्रम शेलवले, डॉ. रविंद्र आत्राम, डॉ. स्मिता पठारे, डॉ. सुस्मिता बोरकर, संचालक दत्ता शिदें, प्रशासकीय अधिकारी बाळाराम सांगळे, सर्जेराव कडू, डॉ. शुक्राचार्य वाघमोडे आदि उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान यावेळी लहान मुलावर अध्यात्मिक संस्कार व्हावेत, मुलानमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी व भविष्यात ही मुले देशाचे चागले नागरीक व्हावेत यासाठी उपस्थित विद्यार्थ्यी व नागरीकासाठी किर्तण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
उध्दघाटन कार्यक्रमासाठी आश्वीसह पंचक्रोशीतील नागरीकानी उपस्थित राहावे असे आवाहन अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.