◻ अवघ्या तीन दिवसात पोलीसानी घेतले तिघाना ताब्यात
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तिघाच्या मुसक्या आश्वी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात आवळल्या असून या मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, १ जुलै रोजी रात्री १५ वर्षीय मुलगी ही कुटुंबियासमवेत घरात झोपलेली होती. पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास कुटुंबातील व्यक्तीना जाग आल्यानतंर ती आढळून न आल्यामुळे मुलीचा परिसरात शोध घेतला परंतू ती सापडली नाही. त्यामुळे जवळचे नातेवाईक तसेचं इतरत्र शोध घेऊनही मुलगी आढळून आली नाही. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यावेळी घटनेतील गाभिर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी काही संक्षयिताना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पोलिसांच्या हाती धागेदोरे सापडले होते.
त्यामुळे पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली साहय्यक फौजदार शिवाजी पवार, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, हेड कॉस्टेबल वाकचौरे, पारधी, पाटोळे, ब्राम्हणे, दिघे, सोनवने, निलेश वर्पे, रणधीर, दांडगे, शिदें यांच्या पथकाने आरोपी विवेक उर्फ विकी रवीद्रं मुन्तोडे (वय - १९, ता. संगमनेर), गोरक्ष कदम (वय - ३४, ता. संगमनेर) व अक्षय मुन्तोडे (पुर्ण नाव माहित नाही) याना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
यावेळी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर नंबर ११८/२०२२ नुसार भादंवी कलम ३६३, ३७६, ३४ सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, १६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये हे करत आहेत.
दरम्यान तिनही आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुलीला कुटुंबाच्या ताब्यात दिले आहे.