आश्वी खुर्द येथिल माऊली कृपा पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

संगमनेर Live
0
शेतकऱ्यासह व्यापारी व सभासदामध्ये आनंदाचे वातावरण

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल दूध उत्पादकासह सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, तरुण, गोर-गरीब नागरीक, मजूंर व महिलासाठी कामधेनु म्हणून मागील २९ वर्षापासून कार्यरत असलेल्या माऊली कृपा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २०२२-२७ साठीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब भोसले याच्यां मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली आहे.

माऊली कृपा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही आश्वी खुर्द सह पंचक्रोशीतील सर्व सामान्य शेतकरी, दूध उत्पादक, व्यापारी, लहान मोठे व्यावसायिक, शेत मजूंर, महिला बचत गट आदिना मागील २९ वर्षापासून मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य करत असल्याने संस्था आश्वी खुर्द सह पंचक्रोशीतील गावाची कामधेनू म्हणून ओळखली जाते. काही तुरळक घटना सोडल्यास सभासदासह नागरीकाच्या विश्वासास ही संस्था पात्र ठरली आहे. 

या संस्थेचे ५२० सभासद आहेत. वेळोवेळी संस्थेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या सभासदाच्या सुखा - दु:खात सहभागी होणाऱ्या संचालकाच्या पाठीशी सदैव सभासद उभे राहत आले आहेत. यावेळी ११ संचालक पदाच्या जागासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुक प्रक्रिया बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या निवडणूकीत सर्वसाधारण प्रवर्गातून अनिल सावळेराम भोसले, बाळासाहेब काशीनाथ सोनवणे, अशोक शंकर भोसले, बापुसाहेब निवृत्ती गायकवाड, देवराम पांडूरंग गायकवाड, निलेश बाळासाहेब भवर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून जगदीश अन्तोन मुन्तोडे, महिला राखीव प्रवर्गातून मनिषा सुनील मांढरे व वैष्णवी मकरंद गुणे, इतर मागास प्रवर्गातून संजय गबाजी भोसले, भटक्या विमुक्त जाती, जमाती प्रवर्गातून रमेश देवराम गिते याची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एस. शेख यानी काम पाहिले असून यावेळी संस्थेचे मॅनेंजर संजय कहार यानी त्याना मदत केली.

दरम्यान सर्व बिनविरोध निवडूण आलेल्या संचालकाचे भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त राजेद्रं विखे पाटील, संस्थेचे संस्थापक व जेष्ठ नेते अण्णासाहेब भोसले, कारखाण्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, जेष्ठ मार्गदर्शक माधवराव भोसले, बाळासाहेब मांढरे, अँड. अनिल भोसले, मकरंद गुणे, बाळासाहेब भवर, सरपंच म्हाळु गायकवाड, उपरपंच सुनील मांढरे, बापुसाहेब गायकवाड, दूध संस्थेचे उपाध्यक्ष विजय गायकवाड आदिनी अभिनंदन केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !