संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील झरेकाठी शिवारातील डोळे वस्ती येथे मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्याची डोकेदुखी ठरलेला नर बिबट्या रविवारी पहाटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून या परीसरात मादी बिबट्या व त्याची पिल्ले असण्याची शक्यता वर्तवत आणखी पिजंरे लावण्याची मागणी नागरीकाकडून करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, झरेकाठी शिवारातील डोळे वस्ती परिसरात मागील अनेक दिवसापासून नर व मादी बिबट्या तसेच त्याचे दोन बछडे हे नागरीकाना नजरेस पडत होते. त्यामुळे नागरीकानमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती.
त्यामुळे येथील तरुण शेतकरी व पत्रकार सोमनाथ डोळे यानी वनविभागाकडे पिजंरा लावुन बिबट्ये जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे वनविभागाने डोळे याच्यां गट नंबर १९ मध्ये पिजंरा लावला होता. रविवारी (१७ जुलै) पहाटे यामध्ये एक नर बिबट्या जेरबंद झाल्याचे नागरीकाना कळाल्यातंर बिबट्याला पाहण्यासाठी नागरीकानी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान बिबट्या अडकल्याची माहिती मिळताचं वनक्षेत्रपाल भाग ३ चे सांगळे, उपासने याच्यां मार्गदर्शनाखाली वनरंक्षक जोजरे, वनकर्मचारी पडवळ, चौधरी, सुळे, वाडेकर आदिनी घटनास्थळी धाव घेऊन या बिबट्याला ताब्यात घेतले आहे. तर या ठिकाणी मादी बिबट्या व तिचे दोन बछडे असल्यामुळे आणखी पिजंरे लावुन त्याना जेरबंद करण्याची मागणी शेतकरी सोमनाथ डोळे याच्यांसह परिसरातील नागरीकानी केली आहे.