संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिप्रीं-लौकी अजमपूर ग्रामपंचायतीत आ. राधाकृष्ण विखे पाटील याच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंचपदी सौ. संगिता भाऊसाहेब गिते तसेच नुतन उपसरपंचपदी सुनिल लहानु दातीर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये आ. विखे पाटील गटाचे दहा सदस्य आहेत.
बुधवारी सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रीया पार पडली. यावेळी भाऊसाहेब गिते याच्यां पत्नी सौ. संगिता भाऊसाहेब गिते यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला तर सुचक म्हणुन माजी सरपंच सौ. नंदा गिते ह्या होत्या. तर उपसरपंच पदासाठी सुनिल लहानु दातीर यांनी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर माजी उपसरपंच विकास दातीर यांनी सुचक म्हणुन स्वाक्षरी केली. सरपंच उप सरपंच पदासाठी एक - एकच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पवार यानी काम पाहिले. तर ग्रामविस्तार अधिकारी श्रीमती कल्पना काळे, तलाठी मयुरी मुन्तोडे आदि उपस्थित होते.
दरम्यान या निवडीप्रसंगी प्रा. कान्हू गिते, भाऊसाहेब लावरे, अशोक गिते, भारत गिते, रामदास दातीर, भास्कंर गिते आदि उपस्थित होते. पिंप्री लाैकी अजामपुर ग्रामपंचायत मध्ये आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे दहा सदस्य असुन आमदार बाळासाहेब थोरात गटाचा एक सदस्य आहे.
दरम्यान दर सव्वा वर्षानी नुतन सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी करण्याच्या निर्णयानुसार ह्या निवडी करण्यात आल्या आहे. यावेळी नुतन पदाधिकाऱ्याचें आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सौ. शालिनिताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले.