◻ सभासदासह संस्थेच्या खातेदार व ग्राहकाना मिळणार पारदर्शक सेवा सुविधांचा लाभ
◻ खातेदाराना मिळणार ई-पासबुक
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल माऊली कृपा ग्रामिण बिगरशेती सहकरी पतसंस्थाने आश्वीसह पंचक्रोशीतील दूध उत्पादक, लहान - मोठे शेतकरी, व्यापारी, शेतमजुंर व महिलाच्या अर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नं करत असल्याने मोठा नावलौकीक मिळवला आहे. नुकतेचं या पतसंस्थेच्या इंटरनेट ऑनलाईन प्रणालीचे उध्दघाटन जेष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब भोसले याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
यामुळे संस्थेच्या सभासदासह संस्थेचे खातेदार, ग्राहक व कर्जदाराना पारदर्शक सेवा सुविधांचा लाभ मिळणार आहे. लोक कल्याणासाठी संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती मोबाईल वर उपलब्ध होणार आहे. तसेच खातेदाराना ई-पासबुक मिळणार असल्याने ग्राहकाचे काम हलके होणार असल्याने ग्राहक व सभासदानी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान पतसंस्थेच्या इंटरनेट ऑनलाईन प्रणालीच्या उध्दघाटन प्रसंगी प्रवरा कारखाण्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, बाळासाहेब मांढरे, मकरंद गुणे, अँड. अनिल भोसले, विजय विठ्ठल गायकवाड, तात्या पाटील उर्फ विठ्ठलराव गायकवाड, सरपंच म्हाळू गायकवाड, पत्रकार संजय गायकवाड, देवराम गायकवाड, रमेश गिते, अशोक भोसले, अतुल भोकरे, एकनाथ मुन्तोडे, सोपान सोनवणे, संजय भोसले, सुनील सोनवणे, आप्पा येवले, सुरेश गायकवाड, युनुस सय्यद, बापूसाहेब शिंदे, अमोल मुन्तोडे, संजय कहार आदि उपस्थित होते.