◻ जिल्हा आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सतिश जोशी याच्यां अध्यक्षतेखाली ‘घरकुल मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे व तालुका गटविकास अधिकारी अनिल नागणे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे हे कोविड आजाराच्या समस्यावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आद्याप कोरोना संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरीकाने लसीचा पहिला, दुसरा व त्यानतंर बुस्टर डोस घेणे आवश्यक असून यासाठी लागणारा लसीचा मुबलक साठा आरोग्य विभागाकडे उपलब्ध झालेला आहे. आरोग्य विभागामार्फत आपल्या गावात लसीकरन शिबीर भरवल्यानतंर आरोग्य सेवक लसीकरण पुर्ण करतील. तसेच आरोग्य विभागाबाबत काही अडचण आल्यास आम्हाला माहिती द्यावी असे आवाहन सरपंच सतिश जोशी याना केले आहे.
तालुका गटविकास अधिकारी अनिल नागणे यानी गावातील अपुर्ण घरकुल मुद्दा उपस्थित करत घरकुलाच्या सुरु असलेल्या कामाबाबतची समाधान व्यक्त केले. सन २०१६-१७ ते २०२२-२३ पर्यत २६ घरकुल अपुर्ण आहेत. ते जर पुढील ४ ते ५ महिन्यात पुर्ण केली तर आपल्याला गोठ्यांचे, वृक्ष लागवड प्रस्ताव देता येईल असे स्पष्ट केले. आपली ‘ड’ यादीतील घरकुल पण लवकर मजूंर होणार असून नागरीकाना मोकळ्या जागेत वृक्षारोपन करण्याचे आवाहन त्यानी केले आहे.
दरम्यान यावेळी मान्यवरांच्या हस्ते घरकुल पुर्ण लाभार्थ्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून नुतन घरकुल गृहप्रवेश व नुतन घरकुलाचे भुमिपुजन व वृक्षारोपन करण्यात आले. अंगणवाडी तसेच जिल्हापरिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन अधिकऱ्यानी योग्य त्या सुचना देऊन मुलांच्या आहाराची माहिती जाणुन घेतली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे आभार माजी उपसरपंच बाबासाहेब वाडगे यांनी मानले.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, विस्तार अधिकारी डोखे, सौ. शेळके, चेअरमन मनोहर जोशी, ग्रामसेवक बी. बी. सोनवणे ग्रामपंचायत सदस्य चेतन पर्वत, रावसाहेब जमधडे, सौ. नंदा जोरी, सौ. संगिता वाडगे, सौ. नंदा जोशी, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर वाडगे, बाबासाहेब वाडगे, तुकाराम जोरी, साईनाथ जोशी, शिवाजी जोशी, बाबुराव जोशी, भाऊसाहेब जोशी, सुर्यभान जोशी, बाळासाहेब जोरी, दगडु साळवे, पाणीपुरवठा कर्मचारी तुकाराम पर्वत, ऑपरेटर तेजश्री जोरी, रोजगार सेवक योगेश साळवे, घरकुल पथक व ग्रामस्थं उपस्थित होते.