◻श्री गजानन महाराज शुगर लि. च्या ६ व्या गळीत हंगामाचे रोलर पुजन संपन्न
संगमनेर Live | नव्या हंगामामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप व्हावे या हेतूने मेंटेनेसची सर्व काम अंतिम टप्प्यात झाली असून कारखान्याचे संचालक, जनरल मॅनेजर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद, वाहतुकदार यांची ही कठोर मेहनत व विश्वासामुळेचं आज श्री गजानन महाराज शूगर लि. अग्रक्रमी असल्याचा विश्वास संस्थापक चेअरमन रवींद्र बिरोले यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लि. च्या सन २०२२ - २३ या ६ व्या गळीत हंगामाचे रोलर पूजन रवींद्र बिरोले व शंतनू बिरोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना रवीद्रं बिरोले बोलत होते.
याप्रसंगी संचालिका सौ. आश्विनीताई बिरोले, हरिभाऊ गीते, अॅड. रामदास शेजूळ, केरुबापू मगर, सुभाषराव कोळसे, बाबाजी सागर, बुवाजी खेमनर, बाळासाहेब खेमनर, लक्ष्मण गीते, तान्हाजी बागुल, लालू शेख, गुलाब भोसले, भगवान गोरे, सार्थक गोरे, नंदू मेंधळे, रामकिसन गायकवाड, सुरेश मगर, जनरल मॅनेजर बी. एन. पवार, अनिल वाकचौरे, विजय खरात, गोरक्षनाथ डहाळे, निलेश रणवारे, श्रीकांत इंगळे, विजयकुमार जाधव, सचिन देशमाने, अजित गुळवे आदिसह ऊस उत्पादक सभासद व कामगार उपस्थित होते.
पुढे बोलताना रवीद्रं बिरोले म्हणाले की, तालुक्याच्या पुर्वे कडील असणारा ६७ क्रमाकाचा राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत महत्वाचा असल्याने तत्कालिन बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडून ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. मात्र या रस्त्याच्या कामाला विलंब झाला असला तरी हंगाम सुरु होण्यापुर्वी पानोडी घाटमाथा व रस्त्याचे चढ उतार कमी करुन रस्ता त्वरीत पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली. तर शिंदे - फडणवीस सरकार आल्यामुळे कारखान्याला फायदा होणार असल्याचे म्हणाले आहेत.
यावेळी शंतनू बिरोले म्हणाले की, श्री गजानन महाराज शुगर कारखान्याने कमी कालावधीत एक विश्वास संपादन केला असून कामगार व ऊस उत्पादकाच्या सहकार्याने कारखान्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करत जिल्ह्यात नव्हे तर राज्यात श्री गजानन महाराज शूगर लि. चे नाव निर्माण केल्याचा आवर्जून उल्लेख केला.
जनरल मॅनेजर पवार म्हणाले की, मागच्या हंगामात आपण जास्तीत जास्त गाळप केले असून २०२२-२३ या हंगामा उंचाकी गाळप करण्याचे धोरण आहे. त्याकरिता ऊस उत्पादक व कामगाराचे सहकार्य महत्वाचे असल्याचे त्यानी सांगितले आहे.