बाधांशेजारी तणनाशक फवारल्याने वाग्यांचे उभे पिक गेले जळून

संगमनेर Live
0
मनोली येथिल शेतकऱ्याचे पाच ते सहा लाखाचे अर्थिक नुकसाण

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील मनोली येथिल शेतकरी संजय भास्कंर शिदें याच्यां बाधांशेजारील ऊसाच्या शेतात तणनाशक औषधाची फवारणी केल्यामुळे याचे ३० गुंठे वाग्यांचे ऊभे पिक जळून खाक झाले असून याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या संजय शिदें याना शिविगाळ व दमबाजी करण्यात आल्यामुळे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रांरीत संजय शिदें यानी म्हटले आहे की, माझ्या कुटुंबाचा शेती हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय असून गट नंबर ४६१ मध्ये माझी दीड एकर शेती आहे. यामधील ३० गुंठ्यामध्ये मी वाग्यांचे पिक केले होते. माझ्या शेजारी आमचे भाऊबद यांची ऊसाची शेती आहे. १२ जुलै रोजी त्यानी त्याच्या शेतात टू-फोर-डी या तणनाशकाची फवारणी करत होते. यावेळी हे तणनाशक औषध माझ्या वाग्यांच्या पिकावर उडाल्याने माझे ९० टक्के वाग्यांचे पिक जळून गेले. त्यामुळे माझे मोठे अर्थिक नुकसान झाल्यामुळे मी याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असता मला शिविगाळ व दमबाजी करण्यात आल्याचे दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे.

दरम्यान तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर नबंर ६८७/२०२२ नुसार भादंवी कलम ५०४, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !