◻ पोलीस उप अधिक्षक राहुल मदने व आश्वी पोलीसाची संयुक्त कारवाई
◻ २ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त
◻प्रवरा साखर कारखान्याच्या मालकीच्या ४८ लोखंडी फळ्याची चोरी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी येथिल प्रवरानदी वरील पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या ४८ लोखंडी फळ्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रांर आश्वी पोलीस ठाण्यात रखवालदार आकाश लहानु बर्डे यानी दाखल केली होती. पोलीस उप अधिक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली पोलीसानी अवघ्या ४८ तासात मद्देमालासह या गुन्ह्यातील दोघाना ताब्यात घेतले आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रांरीत रखवालदार आकाश लहानु बर्डे यानी म्हटले होते की, १२ ऑगस्ट रोजी सकाळी लोखंडी फळ्या मोजल्या असता ४८ फळ्या कमी भरल्या. त्यामुळे याबाबतची माहिती मी सुपरवायझर राधाकृष्ण चोपडे यांना फोनवरुन कळवली होती. यानतंर आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नबंर १४७/२०२२ नुसार भादंवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन ६ फूट लाब व दिड फूट उंच अशा ७० किलो वजनाच्या ४८ लोखंडी फळ्या किमंत अंदाजे १ लाख ३४ हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल चोरी गेल्याचे दिलेल्या तक्रांरीत म्हटले होते.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोघे जण चोरलेल्या मालासह अकोले नाका येथे असून चोरीचा मालही गाडीत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी पोलीस उप अधिक्षक राहुल मदने याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताचं त्यानी योग्य त्या सुचना करताचं सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे, गोपनीय विभागाचे विनोद गंभिरे, हवालदार रवीद्रं वाकचौरे, हुसेन शेख, शांताराम झोडंगे तसेच होमगार्ड बुरकुल, मगर व नागरे याच्यां पथकाने मोठ्या शिताफीने मोसीनखान रहीमखान पठान (वय - ३५, रा. अकोलेनाका, संगमनेर) व आवेश नासीर अत्तार (वय २०, रा. जोशी चाळ, देवळाली गाव, नाशिक) या दोघाना २ लाख ५० हजार रुपये किमंतीच्या अशोक लेलंड (एम. एच. १७ बीवाय०९३३) वाहन तसेच ११ हजार २०० रुपये किमंतीच्या ४ लोखंडी फळ्यासह ताब्यात घेतले.
दरम्यान पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता हा मुद्देमाल आश्वी येथून चोरुन आणल्याची कबूली त्यानी दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली सुरु आहे. तसेच आश्वी पोलीसानी अवघ्या ४८ तासात मद्देमालासह दोन आरोपीना ताब्यात घेतल्याने परिसरातील इतर गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.