◻ दुचाकी केली हस्तगत ; अनेक दुचाकी चोरीचा छडा लागण्याची शक्यता
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथून मंगळवार दि. १६ ऑगस्ट रोजी महादु गणपत आंधळे यांची दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत त्यानी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रांर दाखल केली होती. दरम्यान अवघ्या २४ तासाच्या आत पोलीसानी दुचाकी चोराला दुचाकी सह ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रतापपूर येथिल महादु गणपत आंधळे हे मंगळवार दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आश्वी खुर्द येथिल एका खाजगी रुग्णालयात आपल्या नातंवडाना उपचारासाठी घेऊन आले होते. यावेळी दुचाकी रुग्णालयाबाहेर लावत असताना त्याच्याकडून अनावधानाने गाडीला चावी राहून गेली.
उपचार घेऊन रुग्णालयातून बाहेर आले असता त्याना त्याची दुचाकी आढळून आली नाही. त्यामुळे त्यानी इतरत्र शोध घेत असताना रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोघे जण दूचाकी चोरुन घेऊन जाताना दिसले. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर क्रमांक १५०/२०२२ नुसार भादंवी कलम ३७९ नुसार २० हजार रुपये किमंतीची एच. एफ. डिलक्स (एम. एच. १७ एवाय ५६३१) दूचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या २४ तासात सी. सी. टी. व्ही फुटेजच्या आधारे सहाय्यक फौजदार बर्डे, पोहेकॉ वाकचौरे, चापोहेकॉ झोडगे, पोना शेख, पोना साठे, पोना विनोद गंभीरे, पो. कॉ. दैमिवाळ, पो. कॉ. वाघ यांनी मोठ्या शिताफीने आरोपी मारुती सोमनाथ पवार (रा. ओझर बुद्रुक, ता. संगमनेर) याला ताब्यात घेवुन आरोपीच्या ताब्यातुन गुन्ह्यातील मोटार सायकल जप्त केली आहे.
दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास पोना साठे करीत आहे. तर यामुळे परिसरातील अनेक दुचाकी चोरीचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.