◻ आश्वी येथे गणेशत्सवानिमित्त शांतता बैठक संपन्न
संगमनेर Live | अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली असून उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली शनिवारी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळे व त्याच्यां प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
आश्वी सह पंचक्रोशीतील गावानमध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्ष कोरोनासारखे जागतिक संकट उभे राहिल्याने उत्सव अतिशय साध्या पध्दतीने पार पडले होते. परंतू या वर्षी शासनाने निर्बध शिथिल केले असल्यामुळे या वर्षी गणेश उत्सव धूम धडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन आतापासूनच सज्ज झाले असून आश्वी पोलीस ठाण्यात नुकतीच गणेश मंडळांची बैठक पार पडली.
यावर्षी गणेश मंडळानी पोलीस स्टेशनची परवानगीसह ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक असल्याची माहिती देताना पोलीस निरीक्षक सुभाष भोये म्हणाले की, डीजेच्या दोन बेस व दोन टॉपला तोडी परवानगी देण्यात आली असून गणेश मंडळानी उत्संव काळात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन रक्तदान शिबीर, वह्या व पुस्तके वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवावे. कोणाकडूनही सक्तीने वर्गणी वसूल करू नये. शासनाने ठरवून दिलेले नियम मंडळाना बंधनकारक असल्याचे म्हणताना गणेश उत्सव शांततेत व आनंदाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान यावेळी पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोकराव थेटे, दिलिप डेगंळे, सुनील मगर, वैशाली मैड, लोव्हाळे, केदारी, तळोले आदिसह गोपनीय विभागाचे विनोद गभिरें, हेड कॉस्टेबल रवीद्रं वाकचौरे, पोलीस नाईक हुसेन शेख, होमगार्ड नागरे, बुरुकुल, गुळवे आदिसह परिसरातून आलेले गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदंस्य उपस्थित होते.