◻ रविवारी महंत रामगिरी महाराजाच्या काल्याच्या किर्तणाने होणार सांगता
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे श्री संकष्टेश्वर महादेव भंडारा उत्सवानिमित्त त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ११ ऑगस्ट पासून या उत्सवाला सुरवात झाली असून रविवारी (१४ ऑगस्ट) महंत रामगिरी महाराजाच्या काल्याच्या किर्तणाने या भंडारा उत्सवाची सांगता होणार आहे.
उंबरी बाळापूर येथे संकष्टेश्वर महादेव भंडारा उत्सवानिमित्त गुरुवारी हभप भागवताचार्य गोरक्षनाथ महाराज देठे, शुक्रवारी हभप शालिनीताई देशमुख (इंदोरीकर) व शनिवारी हभप जल्लाल महाराज सय्यद यांचे अमृतूल्य किर्तण सेवेचा लाभ नागरीकाना होणार आहे. तसेचं रविवारी (१४ ऑगस्ट) सकाळी १०.३० वा. सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज याचे काल्याचे किर्तण व उपस्थित भाविकाना महाप्रसाद वाटपानतंर या भंडारा उत्सवाची सांगता होणार आहे.
दरम्यान या उत्सवासाठी उंबरी बाळापूर सह पंचक्रोशीतील भाविकानी उपस्थित राहावे असे आवाहन समस्थ ग्रामस्थं व वारकरी संप्रदाय याच्यांकडून करण्यात आले आहे.