◻ दुध उत्पादक संस्था येथे सचिव तसेच अहिल्यादेवी पतसंस्था दाढ खुर्द येथे होते मँनेजर
◻ दाढ खुर्दच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले तुकाराम यमनाजी जोरी (वय - ६३) यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
दाढ खुर्द सहकारी दुध उत्पादक संस्था येथे सचिव तसेच अहिल्यादेवी पतसंस्था दाढ खुर्द येथे मँनेजर पदावर ते कार्यरत होते. दिवगंत तुकाराम जोरी याच्यां पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, चार भाऊ, पुतणे, सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांचे दाढ खुर्दच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान होते.
दरम्यान त्यांच्या पत्नी दाढ खुर्द सेवा सोसायटीच्या विद्यमान संचालिका असून सामाजिक कार्यात सदैव आग्रेसर असलेले चंद्रकांत जोरी व गणेश जोरी यांचे वडिल ते होते.