◻ बिबट्या मोबाईलमध्ये कैद ; विडिओ समाज माध्यमात वायरल
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर - माळेवाडी शिवारातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिनधास्त वावर करणार बिबट्या येथिल सुरज गणपत सांगळे याने आपल्या मोबाईल कँमेरात कैद केला असून हा विडिओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरीकानी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (४ ऑगस्ट) संध्याकाळी ८.३० वाजेच्या सुमारास संदीप विठ्ठल म्हस्के व सुरज गणपत सांगळे हे दोघे झायलो या चारचाकी वाहणातून शिबलापूर - माळेवाडी रस्त्याने शेडगावकडे चालले होते.
यावेळी निर्जनस्थळी गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला त्याना हालचाल दिसली. त्यामुळे त्यानी गाडीच्या प्रकाशात पाहिले असता एक भला मोठा व पुर्ण वाढ झालेला तसेच शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या त्याच्या नजरेस पडला. हा बिबट्या गाडीकडे बघून गुरगुरत असल्याने गाडी हळूहळू पुढे घेण्यास त्यानी सुरवात केली असता बिबट्या रस्त्याने चालत जात पुढे आधारात गुडुप झाल्याचे या विडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान बिबट्या दिसलेल्या जागेपासून हक्केच्या अतंरावर अनेक वस्त्या असल्याने स्थानिक नागरीकानी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.