◻ आ. बाळासाहेब थोरात याच्यांहस्ते ३२५ असंघटित कामगारांना साहित्य वाटप
◻ अंभोरे गणातील असंघटित कामगारांना मिळाला लाभ
संगमनेर Live | समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात असून आज अंभोरे गणातील ३२५ असंघटित कामगारांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले.
यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे काँग्रेस नेते आमदार थोरात याच्यां हस्ते या ३२५ संघटित कामगारांना लोखंडी पेटी, टॉर्च, मच्छरदाणी, जेवणाचा डबा, लेदर शूज आदींसह विविध तेरा वस्तूंचा संच असलेल्या साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सुरेशराव थोरात, उपसभापती नवनाथ आरगडे, संतोष हासे, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, विलासराव कवडे, अंभोरे गावचे सरपंच भास्करराव खेमनर, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र दिघे असंघटित कामगार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे, जनसेवक संतोष वर्पे, बाळू काकड आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, सातत्याने विविध विकासाच्या योजना व जनसामान्यांसाठी केलेले काम यामुळे संगमनेर तालुका हा राज्यात अग्रगण्य तालुका म्हणून ओळखला जातो. प्रत्येक कुटुंबात समृद्धी यावी तसेच समाजातील सर्व घटकांचा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले जात आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना असून योग्य लाभार्थीना त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक काम करावे.
यशोधन कार्यालयाच्या मार्फत तालुक्यातील गवंडी काम करणारे, विहीर काम करणारे, वीट भट्टी काम करणारे असे विविध असंघटित कामगार आहेत. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात असून हा उपक्रम इतरांसाठी दिशादर्शक ठरला असल्याचे हि ते म्हणाले .
रणजित सिंह देशमुख म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गोरगरिबांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळून देण्यासाठी यशोधन कार्यालयाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. असंघटित कामगारांना या साहित्य संच बरोबर विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती, विमा मिळून देण्यासाठी काम होत असल्याचे ते म्हणाले .
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कोल्हे यांनी केले तर सरपंच भास्कर खेमनर यांनी आभार मानले. यावेळी अंभोरे गणातील विविध गावांमधील ३२५ असंघटित कामगारांना साहित्य संचचे वितरण करण्यात आले.