◻ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येथिल ११ विद्यार्थ्याना प्रिफेक्ट अधिकार प्रदान
संगमनेर Live | मागील दोन वर्षाचा काळ कोरोनाचे संकट असल्याने विद्यार्थ्यानचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने ऑनलाइन शिक्षण घेण्यास सांगितले होते. मात्र मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यानी केल्यामुळे मोबाईलचे दुष्परिणाम ठळकपणे दिसण्यास सुरवात झाली. त्यामुळे विद्यार्थ्यानी मोबाईलच्या आहारी न जाता जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष केद्रिंत करावे. असे आवाहन" आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यानी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात ‘प्रिफेक्ट अधिकार प्रदान’ सोहळ्यात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सुभाष भोये बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. टी शेळके होते. पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे विनोद गंभिरे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रिफेक्ट विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आलेल्या विद्यानिकेतन मधील सार्थक महेश गायकवाड, सुदर्शन संजय चव्हाण, आदित्य श्रावण दिघे, प्रसाद विक्रम लावरे, वेदांत अनिल सोनवणे, शुभम बाळासाहेब लांभाते, प्रांजल लक्ष्मण गोडगे, भक्ती अनिल मांढरे, तन्वी राजेंद्र म्हस्के, वैष्णवी दादासाहेब म्हस्के व धनश्री शामराव पाबळ या विद्यार्थ्याना बॅच तसेच साहित्य प्रमुख पाहुणे व प्राचार्य याच्यां हस्तें प्रदान करण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे इनचार्ज प्रा. मुस्ताक शेख, उप मुख्याध्यापक डी. आर. सिनारे, पर्यवेक्षक सातपुते तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.