◻ काँग्रेस नेते आ. थोरात यांच्या हस्ते संगमनेर साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन
संगमनेर Live | संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्शवत ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ या गाळप हंगामाच्या पहिल्या मिल रोलरचे पूजन काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले.
साखर कारखान्यात झालेल्या या रोलर पूजन कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, बँकेचे चेअरमन अमित पंडित, उपसभापती नवनाथ अरगडे, युवक काँग्रेसचे सुभाष सांगळे, राजेंद्र गुंजाळ, संचालक चंद्रकांत कडलग, रामदास वाघ, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिननाथ वर्पे, अभिजीत ढोले, भाऊसाहेब शिंदे, भास्करराव आरोटे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, दादासाहेब कुटे, संभाजीराव वाकचौरे, राजेंद्र दिघे, संजय कोल्हे, रमेश गफले, किरण खुळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, अशोक मुरकुटे, नवनाथ गडाख आदींसह सर्व विभाग प्रमुख व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गोकुळ सुर्वे, तात्यासाहेब तांबे, गिरी बाबा, भास्करराव दातीर या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेरचा सहकार हा राज्याला दिशादर्शक असून या कारखान्यामुळे व सहकारी संस्थांमुळे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. येथील चांगल्या कामाला परमेश्वराचे आशीर्वाद कायम लागले आहे. मागील वर्षी कारखान्याने १५ लाख ५१ हजार मे. टनाचे उच्चांक गाळप केले असून याही वर्षी कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस आहे.
साखर उद्योग हा जागतिक तेजी-मंदीवर अवलंबून आहे. यावर्षी धरण भागामध्ये चांगला पाऊस झाल्याने भंडारदरा ,निळवंडे, आढळा, भोजापुर हे चारही धरण भरले आहे. हे अत्यंत आनंदही आहे.
तालुक्यातील सर्वाचे जीवनमान हे आनंदाने जावे याकरता आपण सातत्याने काम करत आहोत .एक तालुका एक परिवार ही आपल्या तालुक्याची संकल्पना असून सर्वांच्या जीवनामध्ये येणाऱ्या समृद्धीमध्ये नक्कीच सहकाराचा मोठा वाटा आहे. आपण राज्य पातळीवर काम करताना कायम संगमनेर तालुक्याचा लौकिक वाढवला आहे. त्यामुळे संगमनेरचा कायम सर्वत्र अभिमानास्पद उल्लेख होतो. हे सर्वांचे सामुदायिक यश आहे. सर्वजण मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करतात त्याचेच हे यश असल्याचे हि ते म्हणाले.
याचबरोबर आगामी काळात इथेनॉल पासून वाहनांचे इंधन निर्मितीवर भर दिले जाणार असून इथेनॉल पंप उभारणीचाही विचार कारखान्याने करावा असेही त्यांनी सांगितले
याप्रसंगी कारखाण्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जगन्नाथ घुगरकर यानी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब उंबरकर, डी. बी. भवर, रामदास तांबडे, ॲड. शरद गुंजाळ, किशोर देशमुख, ऋतिक राऊत आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.