संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी येथिल प्रवरानदी वरील पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या ४८ लोखंडी फळ्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्यामुळे प्रवरा साखर कारखान्याच्या मालकीचे १ लाख ३४ हजार चारशे रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रांरीत रखवालदार आकाश लहानु बर्डे यानी म्हटले आहे की, मी प्रवरा सहकारी साखर कारखान्यात लिप्ट विभागात मागील १० वर्षापासून नोकरीस असून आश्वी बंधाऱ्यावर रखवालदार म्हणून नेमणूकीस आहे. प्रवरानदीला पाणी आल्यामुळे खाजगी कामगाराकडून त्या लोखंडी फळ्या बंधाऱ्यातून बाहेर काढून एकावर - एक अशा एकून ५१८ लोखंडी फळ्या रचून ठेवल्या होत्या.
१२ ऑगस्ट रोजी मी सकाळी पुन्हा लोखंडी फळ्या मोजल्या असता ४८ फळ्या कमी भरल्या. त्यामुळे याबाबतची माहिती मी सुपरवायझर राधाकृष्ण चोपडे यांना फोनवरुन कळवली. त्यामुळे आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नबंर १४७/२०२२ नुसार भादंवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ फूट लाब व दिड फूट उंच अशा ७० किलो वजनाच्या ४८ लोखंडी फळ्या किमंत अंदाजे १ लाख ३४ हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल चोरी गेल्याचे म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे करत आहे.
दरम्यान आश्वी येथिल बंधाऱ्यात पाणी आडवल्यामुळे शेकडो हेक्टर शेतीला सिंचनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या फायदा होत असतो. बंधाऱ्याती ४६ मोऱ्याचा वापर पाणी अडवण्यासाठी केला जातो. बंधाऱ्याशेजारीचं नदीला पाणी आल्यानतंर लोखंडी फळ्या काढून ठेवण्याची व्यवस्था आहे. परंतू संध्याकाळी यापरिसरात निर्जन स्थळ व लाईट नसल्यामुळे कोणाचेही येणे-जाणे नसते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत चोरट्यानी चोरी केली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.