संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कोल्हार - संगमनेर राज्य महामार्गावरील मांची फाटा येथे शुक्रवारी सकाळी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार सचिन बाळू गायकवाड (वय - २७, रा. निफाड) हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार (एम एच १५ डीझेड ४७४३) सचिन बाळू गायकवाड हा संगमनेरच्या दिशेने चालला होता. याचंवेळी संगमनेरहून येत असलेल्या मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसने (एम पी १३ एबी ३३३३) मांची फाटा येथे दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे सचिन गायकवाड हा गंभीर जखमी झाला होता.
यावेळी रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरीकाच्या मदतीने स्थानिकानी सचिनला प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतू सचिनची नाजुक परिस्थिती पाहता डॉक्टरानी त्याला तात्काळ लोणी येथिल रुग्णालयात हालवण्यास सांगितले. मात्र लोणी येथिल रुग्णालयात उपचारापुर्वीचं सचिनचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती पोलीस पाटील दिलिप डेगंळे यानी दिली आहे.
दरम्यान सचिन हा निफाड तालुक्यातील रहिवासी असलातरी संगमनेर येथे एका खाजगी फायनान्स कंपनीत नोकरीला होता. त्याच्यां अकस्मित व दुर्दैवी निधनाने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.