◻ ऐतिहासिक वारसा जतन करण्याची गरज
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावच्या दृष्टिकोणातून ऐतिहासिक महत्व असलेल्या अश्व स्मारकाची अत्यत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या स्मारक जिर्णोद्धार करण्याची गरज ग्रामस्थ मागणी करत आहे. नुकत्याच या स्मारकाभवती असलेल्या काट्या तसेच गवताची येथिल तरुणानी स्वच्छंता करुन या ऐतिहासिक स्मारकाचा गुदमरलेला श्वास मोकळा केला आहे.
आश्वी खुर्द येथिल एतिहासिक अशा पेशवेकालीन गणेश मंदिराप्रमाणेचं येथिल अश्व स्मारकाचा मोठा इतिहास आहे. परंतू काळाच्या ओघात या स्मारकाची मोठी दुरावस्था झाल्याने हे स्मारक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे ग्रामस्थानी या स्मारकाचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला खरा पण, स्मारक जागेचा तिढा सुटत नसल्याने हे स्मारक जैसे-थे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या जीर्ण स्मारकाभोवती काट्या व गवताचे मोठे कुपंन निर्माण झाल्याने स्मारक दिसेनासे झाले होते.
आश्वी खुर्द गावासाठी हे स्मारक महत्वाचे असल्याचे गावातील वाड - वडील नेहमी सांगत आले आहेत. गावातील कोणताही धार्मिक कार्यक्रम, मंगलकार्य, सामाजिक कार्यक्रम हा या अश्व स्मारकाचे दर्शन घेतल्याशिवाय पुर्णत्वास जात नाही.
त्यामुळे गावचे माजी उप सरपंच संजय गायकवाड, सामाजिक कार्यात नेहमी आग्रेसर असलेले प्रा. देविदास वाळेकर, पप्पु गायकवाड, सचिन तक्ते, अशिष गायकवाड, सचिन पोपळघट, कृष्णा हारदे, ऋषिकेश (छोटू) डमाळे, भाऊसाहेब पवार तसेच आश्वी बुद्रुक येथिल पपलेश लाहोटी आदिनी स्वप्रेरणेतून या स्मारकाची स्वच्छता करुन या स्मारकाचा गुदमरलेला श्वास मोकळा केला आहे.
ऐतिहासिक स्मारक कधी होणार.?
मागील अनेक दिवसापासून अश्व स्मारक व्हावे यासाठी गावातील तरुण जेष्ठाच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थानी यथावकाश निधी देण्यास सुरवात देखील केली. परंतू जागेचा तिढा निर्माण होत असल्याने स्मारक नेमके कोठे निर्माण करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गावचे ऐतिहासिक वैभव नष्ट होत असल्याने ग्रामस्थानी लवकरात लवकर हे स्मारक जतन करण्याचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.