◻ आश्वी पोलीस स्टेशन ७५ व्या स्वातंत्र्य दिनासाठी आकर्षक विद्युत रोषणाईने सजले
संगमनेर Live | भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचाऱ्यानी ‘तिरंगा रँली’ काढली होती. या तिरंगा रँलीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आश्वी बुद्रुकचे एनसीसीचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाल्याने ही रँली नागरीकाचे लक्ष वेधून घेत होती.
यावेळी जनजागृती साठी आश्वी बुद्रुक गावातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, मुख्य बाजारपेठ, सोनार गल्ली, बस स्थानक, कुंभार गल्ली व आश्वी पोलीस ठाणे या मार्गावरुन भव्य प्रभात फेरी काढलेल्या ‘तिरंगा रँली’ने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी पोलिसानी हातात तिरंगा ध्वज घेतला होता. तर एनसीसीचे विद्यार्थी जयघोष करत ‘हर घर तिरंगा’ हा संदेश नागरीकान पर्यंत पोहचवत होते. सवाद्य, शिस्तबध्द व गगनभेदी घोषणा देत निघालेल्या रँलीचे दुतर्फा उभ्या असलेल्या नागरीकानी ठिकठिकाणी स्वागत केले.
दरम्यान ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आश्वी पोलीस स्टेशनवर आकर्षक विद्युत रोषणाईन करण्यात आल्यामुळे हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी नागरीकानी मोठी गर्दी केली होती.