◻ महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णय बदलण्यासाठी कार्यकर्ते ना. विखे पाटील याना गळ घालणार.?
◻ मतदार संघातील त्या गावाचे विखे पाटील याच्यां निर्णयाकडे लागले लक्ष
संगमनेर Live | २०२१ साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रशासकीय पातळीवर संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस पोलीस स्टेशन अतर्गत येणारी ९ गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडण्यात आली होती. त्यामुळे ना. विखे पाटील समर्थक कार्यकर्त्यामध्ये मोठा रोष निर्माण झाल्याने जिल्हाप्रशासनापासून ते मंत्रालयापर्यत वारवार ती गावे पुन्हा जोडण्यासाठी निवेदन व पत्रव्यवहार करण्यात आला होता.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे नुकतीचं शिदें - फडणवीस सरकारमध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील यानी प्रथम क्रमांकावर कँबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे ना. विखे पाटील मंत्री झाल्याने आश्वीसह पचंक्रोशीत नवचैतन्य निर्माण झाले असून आश्वी पोलिस स्टेशन पासून तोडण्यात आलेल्या ९ गावपैकी ती ७ गावे पुन्हा आश्वी पोलीस स्टेशनाला जोडल्या जाण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पुर्वी आश्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत असलेली रहीमपूर, ओझर खुर्द, ओझर बुद्रूक, मनोली, कनकापूर, हंगेवाडी, कनोली ही गावे संगमनेर तालुका पोलिस ठाण्यास २०२१ साली जोडण्यात आल्यामुळे या सातही गावातील ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
वास्तविक यापूर्वी या गावांमधील ग्रामस्थांना तालुका पोलिस स्टेशन दुर पडत असल्याने आश्वी येथे स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अचानकपणे ही सात गावे मागील वर्षी तालुका पोलिस ठाण्यास जोडण्याचा आदेश निघाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
आश्वी येथे सध्या कार्यरत असलेले पोलिस स्टेशन हे सर्वच गावांना मध्यवर्ती असून, हे अंतरही पाच किलोमिटर पेक्षा जास्त नाही. परंतू आता ही गावे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ठ झाल्याने या सातही गावांना घुलेवाडी येथे असलेले तालुका पोलिस स्टेशन हे २५ किलोमिटर अंतरावर पडत आहे.
त्यामुळे कोणतीही घटना घडल्यानंतर तक्रारदाराला तसेच पोलिस प्रशासनालाही घटनास्थळी पोहोचण्यास मोठा विलंब लागू शकतो. ही वस्तुस्थिती सात गावांमधील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाप्रशानापासून मंत्रालयापर्यत वारंवार निदर्शनास आणून दिली होती.
भौगोलिक, सामाजिक व प्रशासकीयदृष्ट्या शासनाचा नवीन आदेश हा या सातही गावांकरीता अतिशय गैरसोईचा असल्याचे नागरीकाचे म्हणणे होते. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यादाच ना. विखे पाटील आश्वी परिसरातील कार्यकर्त्याचा संत्कार स्विकारण्यासाठी येणार आहेत.
त्यामुळे आश्वीसह पचंक्रोशीत नवचैतन्य निर्माण झाले असून आश्वी पोलिस स्टेशन पासून तोडण्यात आलेल्या ९ गावापैकी ती ७ गावे पुन्हा आश्वी पोलीस स्टेशनाला जोडण्याची गळ कार्यकर्ते ना. विखे पाटील याना घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.