◻️ चोरटे सीसीटीव्हीत कैद ; आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही
◻️ कृषी सेवा केद्रं व मेडिकल चोरट्याकडून टार्गेट
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द व पानोडी तसेच राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक या परिसरात मंगळवारी मध्यरात्री भुरट्या चोरानी अनेक दुकानाचे शटर उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दुकानात मोठी रोख रक्कम नसल्याने केवळ किरकोळ रोख रक्कम, मोबाईल व चिल्लरवर चोरट्याना समाधान मानावे लागले आहे. या चोऱ्याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात कोणीही तक्रांर दाखल केली नसल्याची माहिती मिळाली आहे.
मागील अनेक दिवसापासून आश्वीसह पंचक्रोशीतील गावानमध्ये भुरट्या चोऱ्याचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी लहान मोठ्या चोऱ्या झाल्याचे नागरीकाचे म्हणने आहे. मंगळवारी मध्यरात्री पानोडी येथील संदीप वाडेकर व संदीप जाधव यांच्या जनावराच्या औषधाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. आश्वी खुर्द येथे बाजार तळावरील सुनील सोनवणे यांचे कृषी सेवाचे दुकान फोडण्यात आले आहे. या दुकानामध्ये जास्त रोख रक्कम नसल्याने केवळ किरकोळ रक्कम व चिल्लरवरचं चोरट्याना समाधान मानत हात हालवत परत जावे लागले आहे.
तर दाढ बुद्रुक येथे ही तीन दुकाने चोरट्यानी दुकाने फोडल्याची माहिती मिळाली असून बाबासाहेब चंद्रभान जोधंळे यांचे समृध कृषी सेवा दुकानातून १५ रुपये किमंतीचा मोबाइल व ४ हजार रुपये रोख तसेच सचिन प्रल्हाद तांबे याच्यां जनरल स्टोर दुकानातुन स्प्रे, अंतर व ३ हजाराची चिल्लर घेऊन चोरट्यानी पोबारा केला आहे.
आश्वी खुर्द येथे चोरटे सीसीटीव्ही कैद झाले आहेत. या चोऱ्याबाबत आश्वी पोलील ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेले नसून दिवसे - दिवस भुरट्या चोऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने रात्री पोलीसानी गस्त वाढवण्याबरोबरचं या चोरट्याचा बदोबस्तं करण्याची मागणी नागरीकानी केली आहे.
दरम्यान कृषी सेवा केद्रं व मेडिकल दुकाने चोरट्याकडून टार्गेट होत असल्याचे दिसून येत असून कोरोना काळानतंर अर्थिक घडी बसवत असताना चोरीच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या घटनामुळे व्यापारी, व्यावसायिक व नागरीकानमध्ये भितीचे वातावरण आहे.