◻️ ग्रामसेवकाविना विकास व प्रशासकीय कामे ठप्प
◻️ एक ते दीड फूट पाणी व चिखलातून नागरीकाची पायपीट ; अनेक कुटुंबाना मनस्ताप
◻️ शेतातील पिक नुकसाणीचे पंचनामे करण्यासाठी येतायत अडचणी
संगमनेर Live | अतीवृष्टीमुळे संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावातील वाड्या-वस्त्याना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अतिशय बिकट झाला असून मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर साचलेल्या १ ते दीड फूट पाणी व चिखलातून स्थानिक नागरीक, शालेय विद्यार्थी व शेतकऱ्याना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थानी सोशलमीडियाच्या माध्यमातून सुरु केली आहे. तर मागील अनेक दिवसापासून ग्रामपंचायतीला ग्रामसेवकचं नसल्याने सर्व प्रशासकीय कामे ठप्प असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उंबरी बाळापूर येथिल आश्वी-उंबरी शिवरस्ता (लेंडी पुल), पांदी रस्ता यांचे प्रश्नं मागील अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. पावसाळ्यात मात्र या रस्त्यावर एक ते दीड फूटापेक्षा जास्त पाणी साचत असल्याने या भागातील रहीवाशाबरोबरचं, शालेय विद्यार्थी, दैनदिन कामासाठी या रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्याची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
या रस्त्याबाबत अधिक माहिती घेतली असता लेडीं पुल रस्त्याच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या रस्त्याच्या कामाचा प्रश्नं आडकून पडला आहे. पांदी रस्त्यावर डांबरीकरण व साईड गटारसाठी २० लाख रुपये मजूंर असून रस्त्याला असलेले अतिक्रमण तसेच विविध समस्या असल्यातरी लवकरचं समोउपचाराने हा प्रश्नं सोडवून या रस्त्याचे काम लवकरचं सुरु होणार आहे. तसेच लेंडी पुलाजवळली रस्त्याचे निखळलेले पाईप पाण्याचा निचरा झाल्यानतंर लगेच बसवण्यात येणार असून आडवाटाचा (जुना जोर्व रोड) रस्त्याचा प्रश्न ही मार्गी लावणे गरजेचे असल्याची माहिती मिळाली आहे.
मागील अनेक दिवसापासून गावाला कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्यामुळे गावातील विविध विकासकामे ठप्प असून अतीवृष्टीमुळे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेचा प्रश्नं मार्गी लावण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक होणे गरजेचे आहे. अतीवृष्टीमुळे खराब झालेल्या व पाणी साचलेल्या रस्त्यामुळे पिक नुकसाणीचे पंचनामे करण्यासाठी अडचणी येत असल्याचे स्थानिक शेतकऱ्याचे म्हणने आहे. तर सोशलमिडीयाच्या माध्यमातून या रस्त्याच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झडत असल्याने वातावरण चागलेचं तापले आहे.
अतीवृष्टीमुळे गावातील वाड्या वस्त्याना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयणीय अवस्था झाली आहे. परंतू लोकहितासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी बाजूला ठेवून लोकसहभागातून या रस्त्यावर मुरुम टाकण्यासाठी लवकरचं स्थानिक नागरीक व तरुणाशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. तसेच या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागावा यासाठी जिल्हापरिषदेकडे निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधीपक्ष नेते व सदंस्य सरुनाथ उंबरकर यानी दिली आहे.