◻️ संस्थेच्या ३४ व्या सर्वसाधारण सभेसाठी दुध उत्पादक सभासदाना उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात दुग्ध क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या आश्वी खुर्द सहकारी दुध उत्पादक संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. संस्थेच्या सभागृहात चेअरमन मकरंद गुणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती सचिव सुनिल मांढरे यांनी दिली आहे.
यावेळी सभेत अहवाल सालातील तेरिज, ताळेबंद, नफा तोटा, पत्रके, नफा वाटणी, सरकारी तपासणी अहवाल, दुरुस्ती, लेखा परिषक, अंदाजपत्रक मान्यतेसह विविध विषयावर चर्चा होणार आहे.
संस्थेला अहवाल सालात ९३ हजार ८३६ रुपये इतका नफा झाला असून संस्थेला याही वर्षो ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. संस्थेचे एकून सभासद ४४८ असून सभासदाना १२ टक्के डिव्हीडंट वाटप केले जाणार आहे.
संस्थेची गावात स्वमालकीची भव्य इमारत असून संपुर्ण संगणकीय कारभार व बल्ककुलर मधुन दुध गुणवत्ता पाहुन दुधास दर दिला जात असल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी गुणवत्तापुर्ण दूध घालण्यास प्राधान्य देत असल्याने संस्थेची दिवसेंदिवस नावलौकिक वाढत आहे.
दरम्यान उद्या संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस जास्तीत जास्त दुध उत्पादक सभासदानीं उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे व्हा. चेअरमन विजय विठ्ठल गायकवाड, संचालक संपत गायकवाड, राजेद्रं गायकवाड, अविनाश सोनवणे, विठ्ठल मांढरे, अमोल मुन्तोडे, अशोक भोसले, अनिल सोनवणे, नानासाहेब गायकवाड, रामनाथ क्षिरसागर, निलेश भवर, विठ्ठल भोसले, देवराम मांढरे, दिलिप वाल्हेकर, सौ. रुपाली गडकरी, सौ. पद्मा शिदें तसेच संस्थेचे सचिव सुनिल मांढरे, कर्मचारी संतोष भवर, उमेश गाढे, काशीनाथ गायकवाड व लक्ष्मण गायकवाड यानी केले आहे.