◻️ राहाता व संगमनेर तालुक्याला सहभागी होण्याची संधी
संगमनेर Live (अहमदनगर) | अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने १९ सप्टेंबर २०२२ रोजी लोणी येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव भा. उ. खरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
पद्मश्री विखे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दुपारी ३ वाजता ही मार्गदर्शनपर कार्यशाळा सुरू होणार आहे. राहाता व संगमनेर तालुक्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, जात प्रमाणपत्र पडताळणी कामकाजाशी संबंधित प्राध्यापक, कर्मचारी तसेच महाविद्यालय स्तरावरील समान संधी केंद्राचे सदस्य या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.
दरम्यान या कार्यशाळेत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेविषयी मार्गदर्शन व शंकानिरसन करण्यात येईल. या कार्यशाळेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन ही खरे यांनी यानी पत्रकाद्वारे केले आहे.