◻️ आश्वी खुर्द महाविद्यालयात हिंदी भाषा दिवस आणि वाङ्:मय मंडळ उद्घाटन समारभ संपन्न
संगमनेर Live | मानवाचा विकास जसजसा होत गेला तसतसा मानवाने नवनवे अविष्कार करून आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती प्राचीन संस्कृती म्हणून जगभर ओळखली जाते. या पासून विविध देशांनी अनुकरण केले पण, मूळ संस्कृती फक्त आपल्याकडेच आहे. ही आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गौरवाची बाब आहे. असे प्रतिपादन डॉ. अनंत केदारे यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयात हिंदी भाषा दिवस आणि वाङ्:मय मंडळ उद्घाटन समारभ प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. अनंत केदारे बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, डॉ. सुवर्णा जाधव, प्रा. सुनंदा पाचोरे व वाङ्:मय मंडळाच्या चेअरमन प्रा. दिपाली तांबे व्यासपीठावर उपस्थित होत्या. याप्रसंगी कु. नम्रता पर्वत व कु. भावना गायकवाड या विद्यार्थिनीनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी पुढे बोलताना डॉ. केदारे म्हणाले की, भारतीय संस्कृतीचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. तसेच प्राचीन साहित्य परंपरा देखील आपल्याकडेच आहे या साहित्याचे देखील आपण संवर्धन करणे गरजेचे आहे. मानवाला माणूस म्हणून अभे करण्यासाठी साहित्याच करणीभूत आहे.
समाजाचे प्रतिबिंब साहित्यातून व्यक्त होत असते. आजच्या युवकांनी साहित्यावर भर दिला पाहिजे. साहित्यिक कौशल्यानां ओळखून आपला व आपल्या सभोवतालच्या उत्कर्ष सहज शक्य आहे. मानवाला मिळालेल्या देणग्यापैकी साहित्य आणि संस्कृती ह्या अनमोल देणग्या आहेत याचे आपण भान ठेवणे गरजेचे असल्याचे आवाहन केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिपाली तांबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुनंदा पाचोरे यांनी केले. तर आभार डॉ. सारिका रोहम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॅम्पस डायरेक्टर, प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व विभागप्रमुख व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.