◻️ गजानन महाराज शुगर लि. व एचसीटी सन कंपनीत सोलर प्रोजेक्टसाठी करार
◻️ साखर कारखाण्यात थेट गुंतवणूकीचा राज्यातील बहुधा पहिलाचं प्रकल्प
संगमनेर Live | एचसीटी सन ही अमेरीकन कंपनी संगमनेर तालुक्यातील खडकाळ माळरानावर असलेल्या पहिल्या खाजगी श्री गजानन महाराज शुगर लि. कारखान्यात गुंतवणूक करणार असून याबाबत दोघानमध्ये याबाबत २० वर्षासाठी करार झाल्याची माहिती कारखाण्याचे संस्थापक चेअरमन रवीद्रं बिरोले यानी दिली आहे.
महाराष्ट्रातून गुजरातला खाजगी कंपन्या पळवण्याचा मुद्दा महाराष्ट्रात गाजत असताना अमेरीकन कंपनी ही राज्यातील ग्रामीण भागात गुंतवणूक करत असले तर ते भविष्यात येणाऱ्या नव्या औद्योगिक विकासाची नांदी म्हणावी लागले. असे म्हणत रवीद्रं बिरोले पुढे म्हणाले की, एचसीटी सन ही कंपनी सोलर उर्जा निर्माण करणारी एक मोठी विश्वसनीय कंपनी असून ग्राहकाना शुन्य गुंतवणूकीवर उच्च श्रेणीतील सोलर फोटोव्होल्टेइक सिस्टीमचा पुरवठा करत असते. याबाबत आम्ही कंपनीशी सविस्तर चर्चा करुनचं श्री गजानन महाराज शुगर लि. च्या पुणे येथिल मुख्य कार्यालयात एचसीटी सन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी येऊन कारखाण्याचे संस्थापक चेअरमन रवीद्रं बिरोले, संचालक शंतनु बिरोले व अधिकाऱ्याच्या उपस्थित कराराचे सोपस्कार पार पडले असल्याचे सांगितले.
ही सोलर फोटोव्होल्टेइक सिस्टीम प्रकल्प सुरु झाल्यानंतर कारखान्याला याचां मोठा फायदा होणार आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार व कारखाण्याचे सभासद यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती रवीद्रं बिरोले यांनी दिली आहे.
दरम्यान एचसीटी सन कंपनी बरोबर कारखाण्याची २० वर्ष कराराने गुंतवणूक प्रक्रीया पार पडली असून परदेशी कंपनीने थेट राज्यातील साखर कारखाण्यात १०० टक्के गुंतवणूक केल्याचे एकमेव उदाहरण असल्याचा दावा बिरोले यानी केला आहे.
हा प्रकल्प पुढील पाच महिन्यात पुर्ण करुन वापर सुरु होणार असल्याचे सांगताना या प्रकल्पामुळे कारखाना परिसरातील विकासापासून दूर असलेली शेकडो गावाना औद्योगिक क्रांतीचा फायदा होणार असल्याचे शेवटी रवीद्रं बिरोले म्हणाले आहेत.