◻ ना. विखे पाटील याच्यां निधीतून आदिवासी वस्तीवर स्वतंत्र रोहीत्र बसवल्याने रहीवाशांना दिलासा
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पोनोडी गावातील ठाकरवाडी येथील आदीवासी बांधवासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून रोहीत्र बसवून देण्याचा निर्णय घेतल्याने या वाडीचा वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदार संघात आमदार निधीतून आतापर्यत ३७ रोहीत्र बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
वीजेचा प्रश्न गंभीर होत असून वीज ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच रोहीत्र बिघडण्याच्या घटनांची संख्या वाढत असून, बील न भरण्याच्या कारणाने वीज वितरण कंपनी कडून रोहीत्र उपलब्ध करून दिले जात नसल्याने वितरण कंपनी आणि शेतकऱ्यामध्ये संघर्षाचे प्रकार घडले. यासर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात रोहीत्र बसविण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. राज्यात असा निर्णय करणारे विखे पाटील हे एकमेव आमदार आहेत.
आता पर्यत मतदार संघातील ३७ गावांसाठी ३७ रोहीत्र बसविण्याचे काम पूर्णत्वाकडे गेले असून टप्प्या टप्प्याने हे काम पूर्ण करण्यासाठी काम सुरू असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
पानोडी येथील ठाकारवाडी येथील वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून मंत्री विखे पाटील यांनी प्राधान्याने या वस्तीसाठी स्वतंत्र रोहीत्र बसविण्याचा निर्णय घेवून आदीवासी वस्तीतील रहीवाशांना दिलासा दिला आहे. पुर्वी असलेल्या रोहीत्रामुळे वीज प्रवाह कमी दाबाने होत होता त्यामुळेच घरातील वीज पुरवठ्यासह पाणी पुरवठ्यात अडथळे निर्माण होत होते.
नव्या रोहीत्रामुळे यासर्व अडचणी दूर होवून वस्तीसाठी चांगला वीज प्रवाह मिळणार असल्याचे समाधान राजेंद्र कडाळे यांनी व्यक्त केले. आज वाडीतील रोहीत्र बसविण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय जाधव, अशोक तळेकर, राजेंद्र जाधव, रावसाहेब घुगे, भारत शेवाळे, नईमभाई सय्यद, रंगनाथ मुंढे, शिवराम मधे, रमेश मेंगाळ, विजय भुतांभरे, नामदेव भुतांबरे, अशोक भुतांबरे, भावका मेंगाळ आदी ग्रामस्ध उपस्थित होते.