कजबेवस्ती येथील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती

संगमनेर Live
0
महिलांनी आरोग्य बरोबर मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याची गरज - पो. नि. ज्योती गडकरी

संगमनेर Live (निशांत दातीर) | गौरी-गणपती नंतर दसरा-दिवाळी हा दोन महिन्यांचा सणांचा उत्सव असल्याने या काळात महिलांनी आरोग्यबरोबरच मौल्यवान वस्तूंचीही काळजी घेण्याचे आवश्यकता आहे. सध्याच्या ग्लोबोलायझेशनच्या युगात मोबाईल जनसंपर्काऐवजी करमणुकीचे साधन बनत चालला आहे. अनेक चोर्‍या या मोबाईलवर करमणुक करत असतांना होणार्‍या दुर्लक्षामुळेच होतात. महिलांनी सणासुदीच्या काळात दागिन्यांचा मोह टाळून स्वत:ची व कुटूंबाची होणारी आर्थिक व मानसिक हानी टाळावी. आपला पती हाच मोठा सौभाग्याचा दागिना असल्याने प्रतिपादन पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांनी केले.

नगर येथील कजबेवस्तीवरील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी महिलांशी संवाद साधला. 

यावेळी सौ. शोभा दातीर, शैला बारगळ, आश्विनी शेंडगे, ममता सोलार, प्रगती कुटे, वृषाली शिरसाठ, पुनम भोर, उषा शेंडगे, सौ. खांदवे, भंडारी, निशांत दातीर, कुणाल जायकर, प्रा. विष्णू बारगळ, बाळासाहेब शेंडगे, दत्तात्रय सोलाट, विशाल गुंजाळ, बाळासाहेब थोरात, गणेश भोर, अमोल काळे, आदिनाथ बर्डे, युवराज कजबे, संदिप क्षीरसागर, अंकुश गावडे, जगदीप सानप, इंजि. डि. आर.शेंडगे, स्वप्नील जतकर, योगेश कुलकर्णी, जयराम काळे, हरिष बराटे, रविंद्र लोखंडे, प्रा.सुजित कुमावत आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना पोलीस निरीक्षक गडकरी म्हणाल्या, मौल्यवान वस्तूंपेक्षा मनुष्याचे जीवन महत्वाचे आहे. पोलिस व नागरिक यांच्या संवादातून अनेक गंभीर गुन्ह्यांचे उकल होत असते. पोलिस ठाण्यात कामाशिवायही येणे चांगले असते. पोलिसांशी संपर्कात रहा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य खांदवे यांनी केले तर आभार हेमंत कुटे यांनी मानले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !